AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR Eliminator Live Streaming : हैदराबाद-राजस्थान एलिमिनेटरसाठी सज्ज, कोण पोहचणार क्वालिफायर 2 मध्ये?

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals IPL 2026 Eliminator Live Scorecard : एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 साठी पात्र होईल. तर पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतून पॅकअप होईल. त्यामुळे एलिमिनेटरमध्ये कोणता संघ विजयी होणार? याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

SRH vs RR Eliminator Live Streaming : हैदराबाद-राजस्थान एलिमिनेटरसाठी सज्ज, कोण पोहचणार क्वालिफायर 2 मध्ये?
SRH vs RR Eliminator IPL 2026
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 27, 2026 | 1:53 AM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायन्सवर मात करत आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील फायनलमध्ये धडक दिली. तर गुजरात टायटन्सला पॉइटंस टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे. मात्र गुजरातला त्यासाठी क्वालिफायर 2 सामना खेळावा लागणार आहे. गुजरातसमोर क्वालिफायर 2 सामन्यात कुणाचं आव्हान असणार? हे 27 मे रोजी निश्चित होणार आहे. बुधवारी एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधी चाहत्यांचं एलिमिनेटर सामन्याकडे लक्ष असणार आहे. या एलिमिनेटर सामन्यात रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. या निमित्ताने एलिमिनेटर सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना कधी?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना बुधवारी 27 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना कुठे?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंडीगड इथे होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स एलिमिनेटर सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओ हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान हैदराबाद विरुद्ध राजस्थान यांच्यात आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 3 सामने खेळवण्यात आले आहेत. हैदराबादचा या 23 पैकी सर्वाधिक सामन्यात दबदबा राहिला आहे. हैदराबादने राजस्थानला 14 सामन्यांत पराभूत केलंय. तर राजस्थानने हैदराबाद विरुद्ध 9 सामने जिंकले आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी