Thalapathy Vijay: थलपती विजय यांचं खरं नाव काय? तामिळ भाषेत Thalapathy चा अर्थ काय?
Thalapathy Vijay Name Meaning: दाक्षिणात्य सुपरस्टार जोसेफ विजय हे आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. मोठ्या सस्पेन्सनंतर त्यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण विजय यांचे खरे नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर थलपती हे नाव त्यांना कुणी दिले. त्याचा अर्थ काय हे ही जाणून घ्या...

Thalapathy Vijay Name Meaning: तामिळनाडून विधानसभेचा निकाल लागला. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. थलपती विजय यांच्या तमिलगा वेट्टी कझगम TVK या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तामिळनाडूत सरकार तयार करण्यासाठी 118 जागांचं बहुमत लागतं. इथं 107 आमदार टीव्हीकेचे आहेत. तर काँग्रेसचे पाच आणि इतर पक्षांनी सहकार्य केल्याने त्याचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण झाले. या सुपरस्टारने आता मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. चित्रपटानंतर त्यांची राजकीय सुरुवात सुद्धा धमाकेदार राहिली. पण जोसेफ विजय हे त्यांच्या नावाच्या अगोदर थलपती का लावतात, त्यांच्या नावाचा का अर्थ होतो?
एकदा नाही तर दोनदा बदलले नाव
थलपती विजय यांचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असे आहे. ते अगोदर याच नावाने ओळखले जायचे. पण जेव्हा त्यांनी चित्रपटाची साथ धरली, तेव्हा त्याच्या नावात बदल करण्यात आला. नाव होण्यासाठी, चित्रपट चालावा म्हणून हा बदल अनेक जण करतात. काही जण नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करतात. तर काही जण नाव बदलतात. विजय यांच्या सोबत असंच काहीसं घडलं. चित्रपट करिअरच्या सुरुवातीला विजय यांच्यासोबतच असंच काहीसं घडलं.
त्याचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एसए चंद्रशेखर यांनी विजय यांचे नाव इलैया थलपती असे ठेवले. त्याचे अनेक चित्रपट याच नावाने झाले. त्याच्या काही मुलाखतीतही हेच नाव आहे. अनेक वर्षे तो याच नावाने ओळखल्या जात होता. पण जवळपास दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांनी 2017 मध्ये त्यांचे नाव थलपती विजय असे केले. चित्रपट हिट व्हावा यासाठी त्यांनी हा बदल केला. तेव्हापासून चाहते, प्रेक्षक त्याला थलपती विजय या नावानेच ओळखू लागले.
थलपतीचा अर्थ तरी काय?
तर विजय यांच्या नावासमोर थलपती लावल्या जाते. थलपती हे नाव तामिळनाडूमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या थलपती या चित्रपटानंतर हे नाव अत्यंत गाजले. प्रसिद्ध झाले. तामिळ भाषेत थलपती याचा अर्थ सेनापती असा होतो. या नावाला अत्यंत आदर आहे. थलपती विजय हे आता खऱ्या अर्थाने तामिळनाडूचे सेनापती झाले आहेत. ते आता संवैधानिक पदावर विराजमान झाले आहेत.