GK : फोनच्या डायल पॅडवर का असतात * आणि # ही चिन्हं ? रोज वापरूनही अनेकांना माहीत नसेल हे गुपित

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात आज मोबाईल असतो. त्यातल्या डायलर पॅडचा आपण बरेचदा वापर करतो. तिथे 1 ते 9 नंबर तर असतातच पण त्यातही '*' आणि '#' असे सिंबॉल असतात. पण त्याचा उपयोग काय, ते का दिलेले असतात असा प्रश्न कधी पडला आहे का ?

GK : फोनच्या डायल पॅडवर का असतात * आणि # ही चिन्हं ? रोज वापरूनही अनेकांना माहीत नसेल हे गुपित
मोबाईल डायल पॅड
Image Credit source: Matthias Balk/picture alliance via Getty Images
manasi mande | Updated on: Jan 14, 2026 | 3:42 PM

इंटरनेटचा शोध लागल्यापासून बऱ्याच गोष्टी शोधणं सोप्या होतं. आणि आपल्या हातात मोबाईल आल्यापासून तर आजकाल माहितीचा महापूर आलेला असतो. पण त्यातला बऱ्याच गोष्टींकडे आपण दुरल्क्ष करतो, त्या मागचं कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे आपण लहानपणापासून पार्ले-जी बिस्कीट खातो, पण त्यातल्या G चा अर्थ बऱ्याच लोकांन माहीत नतो. किंवा टॉयलेटमध्ये रोज फल्श करतोत, त्यावर दोन बटणं का असतात, हेही अनेकांना माहीत नसतं. अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला माहीत नाहीत. तसाच एक प्रश्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तो रोजच्या वापरातील मोबाईलचा. त्यावर * आणि # ही चिन्हं का असतात ? चला जाणून घेऊया.

फोनच्या डायल पॅडवर * आणि # ही चिन्हं

लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आजकाल सगळे मोबाईल वापरतात. त्यावर डायल पॅड असतं, ज्याचा आपण कॉल करण्यासाठी वापर करतो. त्याच डायलर पॅडवर 0 ते 9 हे नंबर असतात. तसेच त्यासोबतच * आणि # ही चिन्हं अर्था सिंबॉलही असतात. आप्लायपैकी अनेकांनी ही दोन्ही बटणं अनेक वेळा वापरली असतील, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ती कशासाठी आहेत? आपण काही कॉल करण्यासाठी त्यांचा वापर करत नाही. चला या चिन्हांचा वापर कशासाठी होतो ते समजून घेऊया,

डायल पॅडवर का असतात ‘*’ आणि ‘#’ ही चिन्हं ?

आता आपण या चिन्हांचा वापर काय ते जाणून घेऊया. डायलर पॅडवरील या दोन बटणांशिवाय आपली बरीच कामं अशक्य झाली असती. ‘*’ आणि ‘#’ ही कीपॅड वरील चिन्ह खरंतर कॉल फॉरवर्डिंग, आपला नंबर लपवणं किंवा बॅलेन्स चेक करण्यासाठी वापरता येतात. या बटणांचा वापर व्हॉइसमेल सारखी डेटा एंट्री कामे पूर्ण करण्यासाठी देखील केला जातो. कॉल वेटिंग आणि मिस्ड कॉल अलर्ट सारख्या सेवा सुरू आणि निष्क्रिय म्हणजेच बंद करण्यासाठी देखील त्यांचा वापर केला जातो.