दीर्घ आजारामुळे कायमचं अंधत्व… तरुणाने UPSC परीक्षेत रचला विक्रम… कसा केला 8 – 10 तास अभ्यास?

अशक्य असं काहीच नाही.... कायमचं अंधत्व़ आल्यानंतर मुलासाठी उभी राहिली आई... तरुणाने UPSC परीक्षेत रचला विक्रम... कसा केला 8 - 10 तास अभ्यास? जाणून घ्या रवी राज याची सक्सेस स्टोरीज...

दीर्घ आजारामुळे कायमचं अंधत्व... तरुणाने UPSC परीक्षेत रचला विक्रम... कसा केला 8 - 10 तास अभ्यास?
| Updated on: Mar 07, 2026 | 1:19 PM

आजच्या स्पर्धेच्या युगात माझ्यासाठी ही गोष्ट कठीण आहे, असं सांगत अनेक जण स्पर्धेत उतरण्याच्या आधीच माघार घेतात. पण या जगात अशक्य असं काहीच नाही… असं पूर्ण एकदा एकदा एका मुलाने सिद्ध करु दाखवलं आहे… जर तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल तर तुम्ही दिवसरात्र मेहनत करुन स्वतःचं ध्येय पूर्ण करता.. असं काही रवी राज यांनी देखील केलं आहे. डोळ्यांनी दिसत नसताना देखील रवी राज यांनी UPSC स्पर्धा परीक्षेत 20 वा क्रमांक मिळवला आहे… नवादा जिल्ह्यातील अकबरपूर ब्लॉकमधील माहुली गावातील रहिवासी रवी राज यांनी एक वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास घडवला नाही तर कठोर परिश्रमाने कोणताही अडथळा दूर करता येतो हे देखील सिद्ध केले आहे…

सांगायचं झालं तर, नव्हेंबर 2024 मध्ये रवी राय राज यांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) 69 व्या नागरी सेवा परीक्षेत भाग घेतला. परीक्षा ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण देखील झालं. याच दरम्यान, त्यांची निवड महसूल अधिकारी पदावर झाली. तेव्हा तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी रवी प्रकाश यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचा सन्मान केला. पण, रवी राज आयएएस अधिकारी बनू इच्छित असल्याने ते नोकरीत रुजू झाले नाहीत. त्यांनी हार मानली नाही आणि अखेर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले.

मोठे स्वप्न पाहणाऱ्या रवी राज लहान असताना त्यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं. दीर्घ आजारामुळे त्यांनी आपली दृष्टी पूर्णपणे गमावलीं. त्यांचा जन्म एका लहानशा गावात शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांमुळे लोकांना वाटत होतं की रवी यांचं आयुष्य आता अंधारात आहे, परंतु त्यांची आई विभा सिन्हा यांनी मुलाच्या स्वप्नांचा प्रकाश कायमचा तेवत ठेवण्याचा दृढनिश्चय केला…

रोज 8 – 10 तास करायचे अभ्यास…

रवी राज यांची अभ्यासाची पद्धत अनोखी होती. रवी राज दररोज 8 ते 10 तास अभ्यास करायचे. त्यांची दृष्टी कमी असूनही, ते डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करायचे. त्यांच्या या प्रवासात आईने मोठी भूमिका बजावली.

Follow Us