AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RCB : बॉल जमिनीला लागला तरीही कॅच आऊट, रजतला बाद देण्यावरुन राडा, विराट संतापला, पाहा व्हीडिओ

Rajat Patidar Catch Dismissal Controversy : नियमानुसार चेंडूचा आणि जमिनीचा एकमेकांना स्पर्श झालेला नसेल तरच फलंदाज कॅच आऊट समजला जातो. मात्र रजत पाटीदार याच्याबाबत तसंच काही झाल्याने वाद झाला आहे.

GT vs RCB : बॉल जमिनीला लागला तरीही कॅच आऊट, रजतला बाद देण्यावरुन राडा, विराट संतापला, पाहा व्हीडिओ
Rajat Patidar Catch Dismissal ControversyImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 30, 2026 | 9:15 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने घरच्या मैदानात अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या सलामी जोडीने संयमी सुरुवात केली. मात्र त्यानंतर गुजरातने आरसीबीला झटपट 2 झटके देत सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनतर कॅप्टन रजत पाटीदार याने सहकाऱ्यासोबत आरसीबीचा स्कोअरकार्ड हलता ठेवला. मात्र यादरम्यान रजतला कॅच आऊट देण्यावरुन वादाला तोंड फुटलं आहे. रजतला कॅच आऊट देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. पंचांच्या या निर्णयावरुन विराट कोहली यानेही संताप व्यक्त केला आहे. नक्की काय झालं? हे आपण जाणून घेऊयात.

आरसीबीची संयमी सुरुवात

विल जॅक्स आणि विराट कोहली या दोघांनी आरसीबीसाठी 2.4 ओव्हरमध्ये 34 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर जेकब बेथल याच्या रुपात आरसीबीने पहिली विकेट गमावली. जेकबने 5 धावा केल्या. जेकबनंतर विराट कोहली चौथ्या ओव्हरमध्ये आऊट झाला. विराटने 28 धावा केल्या. सलामी जोडी आऊट झाल्याने आरसीबीचा स्कोअर हा 2 आऊट 35 असा झाला.

लाईव्ह स्कोअरकार्ड

आश्वासक सुरुवातीनंतर झटपट 2 झटके गेल्याने आरसीबी बॅकफुटवर गेली. मात्र त्यानंतर देवदत्त पडीक्कल आणि कॅप्टन रजत पाटीदार याने आरसीबीचा डाव सावरला. दोघेही सेट झाले होते. मात्र या दरम्यान पंचांच्या एका निर्णयामुळे रजत पाटीदार याला मैदानाबाहेर जावं लागलं.

थर्ड अंपायरच्या निर्णयाने वाद

अर्शद खान याने टाकलेल्या आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रजतने जोरात फटका मारला. रजतने मारलेला फटका त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला. रजतने मारलेला फटक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. बॉल हवेत असल्याने कगिसो रबाडा उलटा धावत गेला. मात्र जेसन होल्डर याने कॅच घेतला. होल्डर कॅच घेतल्यानंतर जमिनीवर पडला. या दरम्यान होल्डरच्या डाव्या हातातील चेंडू जमिनीला स्पर्श झाला. मात्र त्यानंतरही थर्ड अंपायरने रजतला कॅच आऊट जाहीर केलं. रजतला आऊट देण्याच्या निर्णयावरुन विराट कोहली आणि आरसीबीचे बॅटिंग कोच अँडी फ्लॉवर यांनी नाराजी जाहीर केली. तसेच आता सोशल मीडियावरही रजतला आऊट देण्याच्या निर्णयावरुन चर्चा पाहायला मिळत आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?