AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : बदलापुरात स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट

| Edited By: | Updated on: Jun 16, 2026 | 7:50 AM
Share

Maharashtra News LIVE : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर धाराशिव जिल्ह्यात खव्यानंतर आता दूध डेरीवर दुधाची तपासणी. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील प्रसिद्ध मराठवाडा डेअरी मध्ये दुग्धजन्य पदार्थाचे नमुने घेतले, यांसह महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी.

Maharashtra News LIVE : बदलापुरात स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट

पुणे शहरात आजपासून पाणीकपात होणार आहे. 50 टक्के शहराला सम तर 50 टक्के शहराला विषम तारखांना पाणीपुरवठा होणार. खडकवासला धरणसाखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर आजपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले झाले असून पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विकासकामांमुळे बंद असलेले मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार. आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल, त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणं मांडलं जाणार आहे. यासह देश विदेश, क्रीडा., मनोरंजनसह इतर क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jun 2026 06:50 PM (IST)

    सोशल मीडियावर बदनामी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

    मुंबई गुन्हे शाखेने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यावसायिकांची बदनामी करून खंडणी उकळणाऱ्या एका सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. मुलुंडमधील एका व्यावसायिकाकडून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. आरोपीकडून एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना कारवाई करण्यात आली.

  • 15 Jun 2026 06:36 PM (IST)

    राजस्थानमध्ये अभिजीत दिपके यांना मारहाण, मारहाणीनंतर पहिली प्रतिक्रिया समोर

    कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना राजस्थानमधील जयपूरमध्ये मारहाण झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी ट्विटरवर आपली भावना व्यक्त केली आहे.  मी गांधी आणि आंबेडकरांचा अनुयायी असून, शांतता आणि प्रेमाने ही लढाई लढत राहीन, असं दिपके यांनी म्हटलं आहे.

  • 15 Jun 2026 06:15 PM (IST)

    सहलीला निघालेल्या नाशिकमधील भाजप नगरसेवकांच्या बसचा किरकोळ अपघात

    मतदारांच्या सहलीला निघालेल्या भाजप नगरसेवकांना हॉटेल आवारातच बसला झटका

    अतिउत्साहात शहराध्यक्ष सुनील केदार बसच्या ड्रायव्हिंग सीटवर

    ड्रायव्हरला उतरवून स्वतः बसचे स्टेअरिंग घेतले होते हाती

    बस सुरू होताच हॉटेलच्या भिंतीला दिली धडक, अपघातात बसचे किरकोळ नुकसान

    मतदारांना मार्गदर्शन सहलीवर नेताना शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगची रंगली चर्चा

    निवडणुकीआधीच महायुतीच्या सहल रणनीतीला धक्का लागल्याची कुजबुज

  • 15 Jun 2026 06:02 PM (IST)

    बदलापुरात स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट

    बदलापुरात स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. महावितरणच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांच्याकडून उपोषण करण्यात येत आहे.

  • 15 Jun 2026 05:43 PM (IST)

    वाशिममधील मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्हीत गोठ्याला आग, 3 बैलांचा मृत्यू, लाखोंचं नुकसान

    वाशिममधील मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील शेतकरी वेंकटेशराव वामराव देशमुख यांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत गोठ्यातील 3 बैलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर शेती उपयोगी साहित्य आणि चारा जळून खाक झालाय. आगीत मोठे आर्थिक नुकसान झालेय. प्राथमिक पंचनाम्यानुसार 6 लाख 38 हजार रुपयांचे नुकसान झालंय. महसूल विभागाकडून पंचनामा पूर्ण झाला आहे.

  • 15 Jun 2026 05:18 PM (IST)

    कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर हल्ला

    मोठी बातमी समोर आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. राजस्थानमधील जयपूरइथे आंदोलनावेळेस दीपकेवर हल्ला करण्यात आला.

  • 15 Jun 2026 05:08 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पोलीस स्टेशनच्या जवळ गँगवार, नक्की काय झालं?

    छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पोलीस स्टेशनच्या जवळ गँगवार झाल्याचं समोर आलं आहे. सख्ख्या भावांमधील वाद सोडवताना मध्यस्थीचा एकाचा गळा चिरला आहे. त्यामुळे 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

  • 15 Jun 2026 04:54 PM (IST)

    सूचनेशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये – दादा भुसे

    दादा भुसे यांनी म्हटले की, ‘राज्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. आता पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करून ठेवले आहेत. कृषी विभागाकडून जोपर्यत सूचना येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नाही.’

  • 15 Jun 2026 04:40 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकारी म्हणून खैरे यांची ओळख आहे. दिलीप खैरे यांनी याआधी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे.

  • 15 Jun 2026 04:25 PM (IST)

    अमरावती : दिव्यांगांची फरफट, 38 पायऱ्या चढून द्यावी लागली परीक्षा…

    अमरावतीतील एमपीएससी पूर्व परीक्षेदरम्यान दिव्यांग उमेदवारांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत परीक्षा द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रॅम्प, व्हीलचेअर किंवा पर्यायी प्रवेशमार्गाची कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक दिव्यांग परीक्षार्थ्यांना तब्बल 38 पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्ष गाठावा लागला. एका उमेदवाराला तर उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी उचलून वर्गखोलीपर्यंत नेल्याची घटना समोर आली आहे.

  • 15 Jun 2026 04:12 PM (IST)

    चेंबूर : सामाजिक कार्यकर्ते राजू खान यांच्यावर जीवघेणा हल्ला

    चेंबूरच्या अमर नगर परिसरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते राजू खान यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात राजू खान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. हल्ल्यात त्यांचे सहकारी सचिन खडतरे हेही जखमी झाले आहेत.

  • 15 Jun 2026 03:50 PM (IST)

    एसआयटी पथक अयोध्या धाम येथे पोहोचले

    राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांच्या अपहाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) अयोध्येत दाखल झाले आहे. त्यांनी राम मंदिराच्या गेट क्रमांक 11 मधून रामजन्मभूमी परिसरात प्रवेश केला.

  • 15 Jun 2026 03:37 PM (IST)

    सातारा सांगली विधानपरिषदेवरून महायुतीत एकमत

    सातारा सांगली विधानपरिषदेवरून महायुतीत एकमत झालं आहे. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक नेत्यांमधील वादावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली. एकत्रित काम करण्याच्या वरिष्ठ नेते सूचना देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 15 Jun 2026 03:25 PM (IST)

    ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत?

    ठाकरे सेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे नऊ पैकी पाच खासदार गैरहजर होते. आता संजय राऊत दिल्लीला रवाना झाले आहेत. ठाकरेंनी 2019 साली आमच्यासोबत जे केलं तेच त्यांच्यासोबत झालं आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

  • 15 Jun 2026 03:20 PM (IST)

    आफ्रिका: काँगोमध्ये इबोलाचे 782 रुग्ण, 181 मृत्यू

    आफ्रिकेतील काँगो या देशात इबोलाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. इबोलाच्या रुग्णांची एकूण संख्या 782 झाली असून, 181 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 15 Jun 2026 03:10 PM (IST)

    शिवसेना (यूबीटी) उद्या महाराष्ट्रात आंदोलन करणार

    शिवसेना (उद्धव ठाकरे) उद्या महाराष्ट्रभर आंदोलनांची योजना आखत आहे. खासदारांसोबत बैठक घेतल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा जिल्हाप्रमुखांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत, पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलने करण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्या राज्यभरात आंदोलने करणार आहे.

  • 15 Jun 2026 02:55 PM (IST)

    सामानाच्या गोडाऊनला भीषण आग

    मीरा-भाईंदर येथील काशिगाव मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या एका सामानाच्या गोडाऊनमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ​आग एवढी भीषण होती की, गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावर असलेले सामान जळून खाक झाले आहे. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • 15 Jun 2026 02:40 PM (IST)

    सांगलीत राष्ट्रीय गुहागर मार्गावर रास्ता रोको

    सांगलीतील जतच्या मुचंडीमध्ये दलित कुटुंबांवर अन्याय केल्याचा निषेधार्थ राष्ट्रीय गुहागर मार्गावर रास्ता रोको सुरु आहे. तब्बल 1 तास रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प तर गाड्याचा लांबच लांब रांगा.

  • 15 Jun 2026 02:25 PM (IST)

    नागपूरात कॉकरोज जनता पार्टीचे आंदोलन

    नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीतर्फे आंदोलनाचे आयोजन. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनाचे नेतृत्व करणार असून NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे प्रभावित विद्यार्थी सहभागी होणार. आंदोलनात नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

  • 15 Jun 2026 02:15 PM (IST)

    खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा गणेश नाईक यांच्यावर घणाघात

    जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव देऊ शकत नाहीत, ते काय कोणाचे नाव पुसणार? निमंत्रण पत्रिकेच्या कागदावर नाव वगळू शकाल, पण लोकांच्या काळजावर कोरलेले नाव कसे वगळाल? गणेश नाईक, तुम्ही महिलांचे शोषण करून आणि नवी मुंबईचे डोंगर पोखरून बदनाम झालात. आम्ही चांगले नाव कमावले तर तुमची जळणारच. तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे! असे शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे.

  • 15 Jun 2026 12:55 PM (IST)

    शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का जोडत नाही- जयंत पाटील

    “शक्तीपीठ जोडताय, तर पंढरपूर का जोडत नाही?” जयंत पाटलांचा सवाल… ‘शक्तीपीठ आहे का शेतकऱ्याच्या शक्ती. काढण्याचा शक्तीहीन मार्ग’… कामेरीतील शक्तीपीठ. एल्गार मेळाव्यात जयंत पाटलांची टीका…

  • 15 Jun 2026 12:45 PM (IST)

    निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव का नाही याविषयी कल्पना नाही- गणेश नाईक

    निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव का नाही याविषयी कल्पना नाही.. नवी मुंबई पालिका आयुक्तांना याविषयी विचारा… नवी मुंबई पालिका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव नसल्याच्या मुद्द्यावर मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया…

  • 15 Jun 2026 12:30 PM (IST)

    ऑपरेशन टायगर करण्याची आम्हाला गरज नाही-शिरसाट

    ऑपरेशन टायगर करण्याची आम्हाला गरज नाही…. स्वत:चे आमदार सांभाळण्यासाठी बैठक घ्यावी लागते हे दुर्दैव…. ऑपरेशन टायगरबाबत संजय राऊतांच्या विधानावरुन संजस शिरसाटांचा निशाणा….

  • 15 Jun 2026 12:15 PM (IST)

    जिवंत असेपर्यंत महामंडळ बंद होऊ देणार नाही- जरांगे

    जिवंत असेपर्यंत महामंडळ बंद होऊ देणार नाही… मराठा समाजासाठी मराठा-कुणबी स्वतंत्र मंत्रालय असणं आवश्यक… मनोज जरांगेंची प्रतिक्रिया..

  • 15 Jun 2026 11:51 AM (IST)

    विमानतळ बंद होतात तर बांधतात कशासाठी? शर्मिला ठाकरेंचा सवाल

    विमानतळ बंद होतात तर बांधतात कशासाठी? शर्मिला ठाकरेंचा सवाल. पक्ष फोडण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा असं शर्मिला ठाकरे यांनी सुनावलं. शर्मिला ठाकरे हस्ते महिलांना घरघंटी वाटपाचा कार्यक्रम. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.

  • 15 Jun 2026 11:44 AM (IST)

    नागपूरच्या पाचपावली परिसरात एकाच दिवशी चार घरफोड्यांच्या घटना उघडकीस

    चोरट्यांनी घरांमधील लाखो रुपयांची रोकड, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. प्रकरणाचा तपास तहसील पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. नागरिकांची परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी. आरोपींना लवकरात लवकर अटक करून चोरीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी होत आहे.

  • 15 Jun 2026 11:32 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा गेल्या अर्धा तासांपासून रास्तारोको. काँग्रेसने अर्ध्या तासांपासून संभाजीनगर जालना महामार्ग रोखून धरला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे आंदोलन सुरू. संभाजीनगर जालना रस्त्यावरील कॅब्रिज चौकात वाहतुकीचा खोळंबा.

  • 15 Jun 2026 11:14 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यावर गणेश नाईक यांनी काय उत्तर दिलं?

    नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्याबद्दल वनमंत्री गणेश नाईक यांना विचारलं असता ‘मला त्याची कल्पना नाही. आपण महापालिका आयुक्तांना विचार’ असं गणेश नाईक म्हणाले.

  • 15 Jun 2026 11:11 AM (IST)

    मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

    मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होतेय. विविध ठिकाणी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भायखळा पूर्व येथील मनपा माध्यमिक शाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल विष्णू देव वर्मा यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळत आहे. नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत स्वत: राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे.मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.

  • 15 Jun 2026 10:55 AM (IST)

    आज जिल्हा परिषद शाळा या मॉडेल होत आहेत- सुनेत्रा पवार

    “उन्हाळी सुट्ट्यानंतरचा शाळेचा पहिला दिवस मी कधीच चुकवला नाही. शिक्षणक्षेत्राशी माझा आधीपासूनच संबंध आहे. त्यामुळे शाळा ही माझ्या जिव्हाळ्याची बाब आहे. शाळेचा पहिला दिवस म्हटलं की रडारड सुरु व्हायची. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रलोभनं दाखवली जातात. ही उज्वल भविष्याच्या दृष्टीने दाखवलेली चांगली प्रलोभने असतात. अजित दादांची मनोमन इच्छा असायची. शाळा असो की शासकीय कोणतीही इमारत ती दर्जेदार असायला हवी. हा त्यांचा अट्टाहास आणि कल असायचा. म्हणूनच आज जिल्हा परिषद शाळा या मॉडेल होत आहेत, इथं दर्जेदार शिक्षण मिळू लागलंय. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांतून शिक्षण देण्यासाठी आपण अत्याधुनिक लॅब उभारल्यात,” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

  • 15 Jun 2026 10:42 AM (IST)

    आम्ही शाळेत जाताना रडायचो, आता मुलं हसत शाळेत येतात- संजय शिरसाट

    “आमच्या वेळेस वेगळी परिस्थिती होती, आता वेगळी परिस्थिती आहे. आम्ही शाळेत जाताना रडायचो, आता मुलं हसत हसत शाळेत येत आहेत. मुलांना जे वाटतं ते करू द्या, त्यांच्यावर बंधनं टाकू नका. ही शाळा गरीब विद्यार्थ्यांची आहे,” असं संजय शिरसाट म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव उत्साहात पार पडला. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री संजय शिरसाट कार्यक्रमाला उपस्थित होते.

  • 15 Jun 2026 10:35 AM (IST)

    पनवेलच्या वहाळमधील जिल्हा परिषद शाळेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्षकांचं कौतुक

    राज्यभरात आजपासून शाळांना सुरुवात झाली आहे. पनवेलच्या वहाळमधील जिल्हा परिषद शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. यावेळी त्यांनी शिक्षणपद्धती आणि शिक्षकांचं कौतुक केलं. जिल्हा परिषदेतील शाळांचं शिक्षण हे ९० टक्के खाजगी शाळांपेक्षा चांगलं असल्याचं ते म्हणाले.

  • 15 Jun 2026 10:26 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं घेतलं दर्शन

    मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले,”सरकारला गॅझेटियरबाबत सदबुद्धी येऊ देत. सरकार आता सातारा गॅझेटवर काम करतंय. त्याचप्रमाणे राज्यात पाऊस लवकर पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ देत.”

  • 15 Jun 2026 10:15 AM (IST)

    डोंबिवलीच्या सांदप गावात क्रिकेटच्या वादातून शिवसेना शिंदे गटातच राडा

    डोंबिवलीच्या सांदप गावात क्रिकेटच्या वादातून शिवसेना शिंदे गटातच राडा झाला आहे. शाखाप्रमुख विरुद्ध उपजिल्हाप्रमुख असा हा वाद झाला असून क्रिकेटच्या मैदानावरील वाद थेट रक्तरंजित हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. कार अडवून फायटरने जीवघेणा हल्ला केला आहे. २५ ते ३० जणांच्या टोळीने मारहाण केल्याचा शाखाप्रमुख विनोद पाटील यांचा आरोप आहे. तर कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असून क्रिकेट बॅटने मारहाण आणि दादागिरी केल्याचा उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पाटील यांचा प्रतिआरोप आहे. शाखाप्रमुख विनोद पाटील गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

  • 15 Jun 2026 10:08 AM (IST)

    पैसे द्या, मत घ्या.. अशा निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत- काँग्रेस नेते सुनील देशमुख

    “या विधान परिषदेच्या निवडणुका कशा होत आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. पैसे दे आणि मत घे.. अशा निवडणुका पूर्ण महाराष्ट्रात आहेत. पैसे द्यायचे आणि मत घ्यायचं. या निवडणुकीत डिजिटल प्रचाराला स्थान नाही. आज सायंकाळी काँग्रेसची बैठक आहे, त्यात वंचितला पाठिंब्यासंदर्भात निर्णय घेऊ. बाजोरिया निवडणुकीच्या मैदानात असते तर भाजपची 70 टक्के मतं फुटली असती. बाजोरियाचा फॉर्म रद्द करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली,” असे आरोप काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केले.

  • 15 Jun 2026 09:50 AM (IST)

    काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख प्रचारात उतरणार

    अमरावती विधान परिषद; काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख प्रचारात उतरणार हर्षजित देशमुख डिजिटल प्रचार करणार. त्यामुळे काँग्रेस कडून वंचितला पाठिंबा देण्याची चर्चा रखडल्याची सूत्रांची माहिती. तीन दिवसांपूर्वी वंचित आणि काँग्रेसमध्ये बैठक परंतु पाठिंब्याबाबत अजूनही निर्णय नाही.

  • 15 Jun 2026 09:40 AM (IST)

    आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर धाराशिव जिल्ह्यात खव्यानंतर आता दूध डेरीवर दुधाची तपासणी

    धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील प्रसिद्ध मराठवाडा डेअरी मध्ये दुग्धजन्य पदार्थाचे घेतले नमुने. जिल्ह्यात अनेक नामांकित दूध उत्पादक केंद्रातील घेण्यात आले दुधाचे नमुने. कळंब येथील मराठवाडा डेअरी मधील दही, आईस्क्रीमच आणि दुधाचे घेतले नमुने. खव्यानंतर दूध डेरीकडे अन्न व प्रशासन विभागानी वळवलेल्या मोर्चामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील भेसळ करणाऱ्या दूध डेअरी चालकांचे धाबे दणाणले आहेत

  • 15 Jun 2026 09:30 AM (IST)

    धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद मतदारसंघात आमदार तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची पुणे येथे घेतली बैठक. मतदारसंघात न येता सदस्यांना पुण्यामध्ये बोलावून सावंतांच्या बैठका. नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महायुतीविरोधात घेतली होती स्वतंत्र्य भूमिका. तानाजी सावंत काय भूमिका घेणार? कार्यकर्त्यांमध्ये तर्क-वितर्क मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना सावंत यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे महायुतीसह विरोधकांचेही लक्ष

  • 15 Jun 2026 09:20 AM (IST)

    जळगावात सुवर्ण व्यावसायिकाची 18 लाखांत फसवणूक

    जळगावात सुवर्ण व्यावसायिकाची १८ लाखांत फसवणूक झाल्याची घटना समोर. तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्यावरील १९ लाख रुपये कर्ज आहे, ‘तुम्ही १९ लाख रुपये द्या व दागिने मोडून घ्या असे आमिष दाखवून केली फसवणूक. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून ओम संजय महाजन असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा भगवान शिंदे असे फसवणूक झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. आणखी इतर ३ ते ४ सराफा व्यावसायिकांची अशाच प्रकारे लाखोंची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त.

  • 15 Jun 2026 09:08 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

    राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विद्यार्थ्यांसोबत आज संवाद साधणार आहेत. आजपासून राज्यात शाळांना सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

  • 15 Jun 2026 09:05 AM (IST)

    सातारा-पंढरपूर महामार्गावरील आणखी धोकादायक स्पॉट समोर

    माळशिरसमधील भीषण अपघातानंतर सातारा-पंढरपूर महामार्गावरील आणखी धोकादायक स्पॉट समोर. याच महामार्गावरील पिलीव गावातून जाणाऱ्या कालव्यावर कठडे नसल्याने ग्रामस्थ धोकादायक प्रवास करतायत.

  • 15 Jun 2026 08:54 AM (IST)

    पाकिस्तानसोबत चर्चेचे पर्याय खुले ठेवायला हवेत – मोहन भागवत

    पाकिस्तानसोबत चर्चेचे पर्याय खुले ठेवायला हवेत, पूर्णपणे बंद करू नयेत असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. भागवत यांच्याकडून सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंच्या वक्तव्याचं समर्थन.

  • 15 Jun 2026 08:39 AM (IST)

    पुणे – नवीन विद्यार्थ्यांवर शाळेच्या वतीने फुलांची उधळण , पुस्तक आणि खाऊ देऊन स्वागत

    २०२६-२७ नवीन शैक्षणिक वर्षाची आजपासून सुरुवात.  प्रदिर्घ उन्हाळी सुट्ट्यांनतर नंतर राज्यातील शाळा आज पासून सुरू झाल्या आहेत. शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहेत. खूप दिवसानंतर मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटल्यानंतर आज आनंद होत आहे अशी भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे.

  • 15 Jun 2026 08:18 AM (IST)

    धाराशिव मधील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून तपासणी

    धाराशिव मधील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली.  चार दिवसांपूर्वी  बिर्याणीमध्ये मेलेले झुरळ निघाले होते.

    FDA च्या चार जणांच्या पथकांकडून मातोश्री हॉटेलच्या मुख्य शाखेतील स्वच्छतेची कसून तपासणी करत बिर्याणीचे नमुने घेण्यात आले. सहआयुक्त कार्यालयाकडे तपासणी अहवाल पाठविण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. मातोश्री हॉटेल मालकाला अन्न औषध प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली.

  • 15 Jun 2026 08:09 AM (IST)

    सरकारी कार्यालयांचे फेरे टाळण्यासाठी स्थानिक शिवसेना शाखांमध्ये विशेष महाशिबिराचे आयोजन

    सरकारी कार्यालयांचे फेरे टाळण्यासाठी स्थानिक शिवसेना शाखांमध्ये विशेष महाशिबिराचे आयोजन सुरू करण्यात आलं.  कागदपत्र पडताळणी व नोंदणी प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करण्याचा शिवसेनेचा मानस  असून प्रत्येक नेत्याला जबाबदारी दिली .  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी १० 10लोकांना दाखले मिळवून दिले, कामकाजाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचे अभियान मुंबईभर सुरू.

  • 15 Jun 2026 08:06 AM (IST)

    बीड – आष्टी शहरातील गणपती चौकात दुध वाहतूक करणारा पिकअप पलटी, शेकडो लिटर दूध वाया.

    बीड – आष्टी शहरातील गणपती चौकात दुध वाहतूक करणारा पिकअप पलटी झाल्याने शेकडो लिटर दूध वाया गेलं. पिकअप पलटी झाल्याने चारजण किरकोळ जखमी, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. – तालुका दुध संघाकडे संकलीत केलेले दुध घेऊन जाताना घटना घडली. अनेक दिवसांपासून या परिसरातील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असुन लवकरात लवकर रस्त्याचे काम करण्याची मागणी होत आहे.

  • 15 Jun 2026 08:04 AM (IST)

    अमरावती विधान परिषद – काँग्रेसचे उमेदवार हर्षिजित देशमुख करणार डिजिटल प्रचार

    अमरावती विधान परिषद; काँग्रेसचे उमेदवार हर्षिजित देशमुख प्रचारात उतरणार हर्षजित देशमुख डिजिटल प्रचार करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून वंचितला पाठिंबा देण्याची चर्चा रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Published On - Jun 15,2026 8:02 AM

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!