Success Story : शिक्षणासाठी करत होते पार्ट टाईम जॉब, आता १ हजार लोकांना दिला रोजगार

नारायण मजूमदार यांनी १९९९ मध्ये स्वतःचा चिलिंग प्लँट चालवला. २००३ मध्ये मजूमदार यांनी रेड काऊ डेअरी नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर २००७ मध्ये नारायण मजूमदार यांनी कोलकाता डेअरीसोबत काम केले.

Success Story : शिक्षणासाठी करत होते पार्ट टाईम जॉब, आता १ हजार लोकांना दिला रोजगार
| Updated on: Jul 10, 2023 | 8:48 AM

नवी दिल्ली : नारायण मजूमदार यांचा जन्म २५ जुलै १९५८ मध्ये नदीया जिल्ह्यात झाला. सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. १९७५ साली करनाल येथे डेअरी टेक्नॉलॉजीत बीएससी केले. शैक्षणिक खर्चासाठी ते घरच्यांवर पूर्णपणे आधारित नव्हते. सकाळी लवकर उठून पाच ते सात दोन तास ते दूध विकत होते. बंगाल सरकारकडून त्यांना १०० रुपये शिष्यवृत्ती मिळत होती. याशिवाय वडील दर महिन्याला १०० रुपये पाठवत होते. नारायण मजूमदार यांनी १९७९ मध्ये कोलकाता येथे क्वालिटी आईस्क्रिममध्ये डेअरी केमिस्ट म्हणून पहिली नोकरी केली. तीन महिन्यांत ही कंपनी सोडून सिलीगुडीत हिमालयीन को-ऑपरेटिव्हमध्ये नोकरी मिळवली.

आता तीन प्रोडक्शन कंपन्या

नारायण मजूमदार यांनी १९९९ मध्ये स्वतःचा चिलिंग प्लँट चालवला. २००३ मध्ये मजूमदार यांनी रेड काऊ डेअरी नावाची कंपनी सुरू केली. त्यानंतर २००७ मध्ये नारायण मजूमदार यांनी कोलकाता डेअरीसोबत काम केले. रेड काऊ डेअरीच्या तीन प्रोडक्शन कंपन्या आहेत. कंपनीत १ हजारपेक्षा जास्त लोकं काम करतात.

 

८०० कोटी रुपयांचे टर्नओव्हर

जीवनात काही शिकायचं असेल तर पश्चिम बंगालच्या नारायण मजूमदार यांच्याकडून शिकता येईल. नारायण मजूमदार तीन रुपयासाठी कधीकाळी काम करत होते. परंतु, त्यांना ८०० कोटी रुपयांचे टर्नओव्हर होणारी कंपनी स्थापन केली.

शैक्षणिक खर्चासाठी विकत होते दूध

नारायण मजूमदार १७ वर्षांचे होते तेव्हा शिक्षणाचा खर्च काढण्यासाठी दूध विकत होते. त्यातून त्यांना रोज तीन रुपये मिळत होते. हरियाणाच्या करनालमध्ये नॅशनल डेअरी रीसर्च इंस्टिट्यूटच्या कॅम्पासमध्ये दूध विकण्याचे काम करत होते. २२ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी डेअरी कंपनी सुरू केली.

डेअरी कंपनीत दूध गोळा करण्यासाठी सायकलने घरोघरी जात होते. मेहनत आणि संघर्ष करून डेअरी कंपनी उभी केली. रेड काऊ डेअरी देशातील परिचीत ब्रँड आहे. दुधाशिवाय दही, तूप, पनीर आणि रसगुल्ला विक्री करतात. सध्या त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.