Cartville Galaxy: दोन आकाशगंगेत जोराची धडक होऊन तयार झाली कार्टव्हिल आकाशगंगा; अवकाशातील अभूतपूर्व रंगाची उधळण कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Aug 04, 2022 | 12:09 AM

दिल्ली : अंतराळ अर्थात अवकाश हे विविध रहस्यांनी आहे. खगोलप्रेमींना नेहमीच याचे कुतूहल असते तर खगोलशास्त्रज्ञ याचा उलगडा करत असतात. अवकाशातील अभूतपूर्व रंगाची उधळण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अवकाशात दोन आकाशगंगेत जोराची धडक होऊन ही अभूतपूर्व रंग तरंग पहायला मिळेत. याला कार्टव्हिल आकाशगंगा(Cartville Galaxy) असे म्हणातात. या आकाशगंगेचे अनेक रंगीत फोटो ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’(James […]

Cartville Galaxy: दोन आकाशगंगेत जोराची धडक होऊन तयार झाली कार्टव्हिल आकाशगंगा; अवकाशातील अभूतपूर्व रंगाची उधळण कॅमेऱ्यात कैद
Follow us on

दिल्ली : अंतराळ अर्थात अवकाश हे विविध रहस्यांनी आहे. खगोलप्रेमींना नेहमीच याचे कुतूहल असते तर खगोलशास्त्रज्ञ याचा उलगडा करत असतात. अवकाशातील अभूतपूर्व रंगाची उधळण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अवकाशात दोन आकाशगंगेत जोराची धडक होऊन ही अभूतपूर्व रंग तरंग पहायला मिळेत. याला कार्टव्हिल आकाशगंगा(Cartville Galaxy) असे म्हणातात. या आकाशगंगेचे अनेक रंगीत फोटो ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’(James Webb Space Telescope) कॅप्चरे केले आहेत.

नासाच्या जेम्सवेब स्पेस टेलिस्कोप कॅप्चर केली ईमेज

नासाच्या जेम्सवेब स्पेस टेलिस्कोप अतंराळातील घडामोडींवर लक्ष ठेवते. याच्या कॅमेऱ्यात अनेक छायेचित्रे टिपली जातात. आता या टेलिस्कोप कार्टव्हील गॅलेक्सीची नवीन ईमेज कॅप्चर केली आहे. ज्यामध्ये प्रचंड वेग आणि मोठ्या प्रमाणात धूळ कॅप्चर झाली आहे. यामध्ये अभूतपूर्व विविध रंगाची एक रिंग फिरताना दिसत आहे.

आकाशगंगेची टक्कर होऊन बनली कार्टव्हिल आकाशगंगा

पृथ्वीपासून सुमारे 500 दशलक्ष प्रकाशवर्षे लांब स्थित असणाऱ्या दोन आकाशगंगेची टक्कर होऊन कलरफुल कार्टव्हिल आकाशगंगा बनल्याचे नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने(ईएसए) सांगीतले. ज्याप्रमाणे आपण तलावात दगड फेकल्यानंतर त्याचे तरंग निर्माण होऊन एकप्रकारे वलय निर्माण होते, त्याचप्रमाणे दोन आकाशगंगेत जोराची धडक होऊन, एका केंद्रापासून दोन वलयांचा हा विस्तार झाला आहे. यामधील लहान पांढरी रिंग ही आकाशगंगेच्या केंद्राजवळ स्थित आहे तर बाहेरील रिंग ही त्याच्या विविध रंगानी 440 दशलक्ष वर्षांपासून विश्वामध्ये विस्तारलेली आहे.

आकाशगंगेतून ताऱ्यांची निर्मिती होते

ही कार्टव्हील आकाशगंगा जसजशी बाहेरील बाजूला विस्तारत जाते, तसे त्याची वायूंमध्ये निर्मिती होऊन यामधून ताऱ्यांची निर्मिती होते. हबल दुर्बिणीने यापूर्वी आकाशगंगेच्या दुर्मीळ प्रतिमा कॅप्चर केल्या होत्या. अशा लहान घुसखोर आकाशगंगा धडकण्यापूर्वी आपल्या आकाशगंगेसारखी ही सुद्धा सर्पिल आकाशगंगा असल्याचे नासा आणि ईएसएने म्हटले आहे.

10 अब्‍ज डॉलर्स खर्च

बिग बँगनंतर या आकाशगंगांची निर्मिती कशी झाली? यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ ही दुर्बीण अंतराळासंबंधीची असंख्य रहस्ये उलगड्यास मदत करणार आहे. या टेलिस्कोपच्या निर्मितीस 10 अब्‍ज डॉलर्स इतका प्रचंड खर्च करण्‍यात आला आहे. आतापर्यंत अवकाश निरीक्षणात 100 पट शक्‍तीशाली असणारी या या दुर्बिणीच्‍या निर्मितीला 2005मध्‍ये प्रारंभ झाला होता. मात्र विविध कारणांमुळे निर्मिती रखडली होती. कॅलिफोर्नियामध्‍ये यशस्‍वी चाचणीही झाली होती. त्‍यानंतर कोरोना साथीमुळे याचे काम काही महिने बंद होते. मात्र अखेर याचे यशस्‍वी प्रक्षेपण झाले.