AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International custom Day : आज आंतरराष्ट्रीय कस्टम दिन, या दिवसाचे खास महत्व काय? वाचा सविस्तर

दरवर्षी आज 26 जानेवारी (26th January) रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन (International custom Day) साजरा केला जातो.

International custom Day : आज आंतरराष्ट्रीय कस्टम दिन, या दिवसाचे खास महत्व काय? वाचा सविस्तर
प्रातिनिधीक छायचित्र
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jan 26, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : दरवर्षी आज 26 जानेवारी (26th January) रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन (International custom Day) साजरा केला जातो. 26 जानेवारी 1953 रोजी जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ या दिवसाचे आयोजन केले जाते. जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या सीमाशुल्क सहकार्य परिषदेचे पहिले सत्र भरवण्यासाठी जगभरातील 179 सदस्य देशांच्या सीमाशुल्क प्रशासनांद्वारे दरवर्षी 26 जानेवारी रोजी विविध राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. WCO सचिवालय आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनासाठी एक थीम निवडते. जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) डिजिटल सीमाशुल्क अंतर्गत सीमाशुल्क प्रक्रियेच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाला एक वेगळे महत्व आहे, या दिवसामुळेही अनेक देश एकमेकांशी जोडले गेले आहेत.

2017 मध्ये, सुमारे 70,000 कर अधिकार्‍यांनी GST परिषदेने घेतलेल्या काही निर्णयांच्या निषेधार्थ असहकार आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. कामगार संघटनांनी आंदोलन सुरू करत आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन न पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 30 जानेवारीला ‘शहीद दिना’ला काळी पट्टी बांधून ‘ब्लॅक डे’ साजरा करणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जागतिक समीशुल्क संघनटमुळे देशादेशातील व्यापार आणखी सलोख्याचा झाला आहे. जगातील अनेक देशातून एकमेकांबरोबर व्यापार सुरू असतो. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर कस्टम ड्युटी लागते. जसे की आपण बाहेरील देशातून पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणात आयात करतो, जसे अनेक प्रकारची मशिनरी आयात करतो, त्या सर्व वस्तूंवर कस्टम ड्युटी लागते. बाहेरील देशातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत कस्टम विभाग अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो.

जागतिक सीमाशुल्क संघटना ही एक आंतरसरकारी संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे. WCO आंतरराष्ट्रीय अधिवेशने, उपकरणे, कमोडिटी वर्गीकरण, मूल्यमापन, मूळ नियम, सीमाशुल्क महसूल गोळा करणे आणि इतर विषयांचा समावेश असलेल्या क्षेत्रातील कामासाठी प्रख्यात आहे. WCO वस्तूंच्या नामांकनाची आंतरराष्ट्रीय सुसंवाद प्रणाली (HS), व्यापार संघटना (WTO) च्या तांत्रिक बाबी, सीमाशुल्क मूल्यांकन आणि मूळ नियमांची देखरेख करते. सध्या, WCO एकत्रितपणे जगभरातील 180 सीमाशुल्क प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते. आतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने या दिवसाला बरेच महत्व आहे.

कोणाला दिला जातो शौर्य पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार कधीपासून प्रदान करण्यात येतोय?…तर परमवीर आणि महावीर चक्र पुरस्कारबद्दलही घ्या जाणून

गाडीवर तिरंगा फडकावणं गुन्हा आहे? जाणून घ्या तिरंगा कुठं लावावा आणि तिरंग्याचा अपमान नेमका कशामुळे होतो?

कामाची बातमी : नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहात? जाणून घ्या योग्य पद्धतीने कसा घ्यावा हा निर्णय

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा