
जागतिक अनिश्चितता आणि टॅरिफमुळे एकीकडे बाजारात अस्थिरता आहे, तर दुसरीकडे श्रावण महिन्याच्या सुरुवातीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम 99,710 रुपये आहे, जी कालच्या तुलनेत 710 रुपये जास्त आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 91,400 रुपये आहे, जी शुक्रवारीच्या तुलनेत 650 रुपये जास्त आहे. तसेच, 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 540 रुपयांची वाढ झाली असून, त्याची किंमत आता 74,790 रुपये आहे. चला, देशातील काही प्रमुख शहरांमध्ये आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत पाहूया:
वाचा: समलैंगिंक व्हिडीओ बनवून करोडो उकळले; CA राज मोरेने आईला शेवटची चिठ्ठी लिहित स्वत:ला संपवले
चांदीच्या किंमतीतही वाढ
चांदीच्या किंमतीतही एका दिवसात 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी, 11 जुलै रोजी 1 किलो चांदीची किंमत 1,11,000 रुपये होती. तर आज ती 1,15,000 रुपये प्रती किलो आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगलुरू यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चांदी हा दर आता स्थिर आहे. मात्र, चेन्नई, हैदराबाद आणि केरळमध्ये चांदी 10,000 रुपये जास्त दराने म्हणजेच 1,25,000 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.