GK Quiz : अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढत जाते, कधीच कमी होत नाही ? ‘या’ प्रश्नांची उत्तरे देऊन चेक करा तुमची IQ लेव्हल

GK Quiz : जीके, जनरल नॉलेज हे फक्त परीक्षेसाठी उपयोगी नसतं तर त्यामुळे आपील विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमताही वाढते. असे प्रश्न आणि उत्तरे मुलांमध्ये तार्किक विचारसरणीला चालना देतात आणि प्रौढांमध्ये उत्सुकता टिकवून ठेवतात. या 10 प्रश्नांची उत्तर द्या आणि तुमचं जीके किती चांगलं आहे तेही चेक करा..

GK Quiz : अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढत जाते, कधीच कमी होत नाही ? या प्रश्नांची उत्तरे देऊन चेक करा तुमची IQ लेव्हल
अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढत जाते, कधीच कमी होत नाही ?
| Updated on: Aug 16, 2025 | 3:13 PM

Top 10 GK Questions : आजच्या काळात जनरल नॉलेज अर्थात सामान्य ज्ञान हा केवळ एक विषय नाही तर तो जीवनाची गरज बनला आहे. जागतिक घटना, विविध संस्कृती आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या वाढण्यास मदत होते. उत्सुकता आणि तयारीने, प्रत्येक कठीण प्रश्न सोडवला जाऊ शकतो.

तुम्ही वर्तमानपत्रं, मासिकं आणि जनरल नॉलेज क्विझमध्ये भाग घेऊन मनोरंजक प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचा सराव करू शकता. हे प्रश्न सोडवल्याने केवळ प्रतिभा वाढतेच असे नाही तर अभ्यासात रसही वाढतो. आज आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानाचे 10 प्रश्न आणि त्यांची उत्तर घेऊन आलो आहोत.चला, विचार करून पहा, सोडवा पहा हे प्रश्न..

1. कोणता समुद्र आफ्रिका आणि आशिया खंडांना वेगळे करतो?

उत्तर : लाल समुद्र (Red Sea) हा आफ्रिका आणि आशियाला वेगळे करतो.

 

2. मानवी त्वचेचा रंग कशामुळे ठरतो?

उत्तर: मेलॅनिन (Melanin)

 

3. विषाणूंच्या अभ्यासाला काय म्हणतात ?

उत्तर: विषाणूंच्या अभ्यासाला विषाणुशास्त्र (Virology) म्हणतात.

 

4. पृथ्वीवर आढळणारा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे?

उत्तर: हीरा (Diamond) हा पृथ्वीवर आढळणारा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे.

 

5. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत?

उत्तर: भारताचे सध्याचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई (Bhushan Ramkrishna Gavai) आहेत.

 

6. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेत कोणते जीवनसत्व तयार होते?

उत्तर: जेव्हा त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा व्हिटॅमिन डी (Vitamin D)तयार होते.

 

7. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी सांगितले?

उत्तर: पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे शोधणारे पहिले खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपरनिकस होते.

 

8. फुलांच्या पुनरुत्पादक भागांना काय म्हणतात?

उत्तर: फुलाच्या पुनरुत्पादक भागांना पुंकेसर (Stamen) आणि कार्पेल (Carpel) म्हणतात.

 

9. उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता?

उत्तर: वटवाघुळ हा (Bats) एकमेव सस्तन प्राणी आहेत जे उडू शकतात.

10. अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढते आणि कधीही कमी होत नाही?

उत्तर: आपलं वय ही अशी गोष्ट आहे, जी आपल्या जन्मापासून वाढत जाते, कधीच कमी होत नाही.