Technology Tips: टीव्ही रिमोटवरील लाल, पिवळे, हिरवे, निळे बटण कशासाठी? 90 टक्के लोकांना माहीतच नाही उपयोग!
Ever Wondered What Coloured Buttons on Your TV Remote Are For: टीव्ही रिमोटमधील पॉवर, व्हॉल्यूम आणि चॅनल बटणे रोजच्या वापरात येतात, पण खालच्या बाजूला असलेली लाल, हिरवी, पिवळी आणि निळी बटणे अनेकदा दुर्लक्षित राहतात.

तुमच्याकडे जुना स्मार्ट टीव्ही असल्यास तुम्हाला त्याच्या रिमोटवर इतर बटणांसोबत लाल, पिवळी, हिरवी आणि निळी बटणे दिसतील. काही सेट-टॉप बॉक्सच्या रिमोटवरही अशी बटणे असतात. ती दाबल्याने अनेकदा काहीच होत नाही, पण जर ती रिमोटवर असतील, तर त्यांचा नक्कीच काहीतरी उपयोग असतो. ही बटणे म्हणजे संदर्भ-संवेदनशील शॉर्टकट आहेत. ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते.
रिमोटवरील लाल, पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या बटणांचा वापर इंटरनेटच्या आधीपासूनच सुरू झाला होता. ही बटणे मूळतः टेलिटेक्स्टसाठी होती, जी इंटरनेट येण्यापूर्वी युरोप आणि यूकेमधील एक माहिती सेवा होती. यामध्ये स्क्रीनच्या तळाशी रंगांनुसार सांकेतिक लिंक्स दाखवल्या जात असत. संबंधित रंगाचे बटण दाबून, वापरकर्ते त्या लिंकवर क्लिक करू शकत होते, ज्यामुळे त्यांना हवामान , बातम्या किंवा इतर माहितीशी संबंधित पानांवर नेले जात असे.
जरी ही सेवा आता बंद झाली असली तरी, टीव्ही कंपन्यांनी ही बटणे देणे सुरू ठेवले आहे आणि आता त्यांचा वापर नेव्हिगेशनसाठी केला जातो. ही रंगीबेरंगी बटणे आजही अनेक टीव्ही रिमोटवर दिसतात. ती शॉर्टकट किंवा हॉटकी म्हणून काम करतात. याचा अर्थ असा की, या बटणांना एक विशिष्ट कार्य नेमून दिलेले असते. बटण दाबल्यावर ते कार्य कार्यान्वित होते.
अनेक कंपन्या ही बटणे सानुकूलित करण्याचा पर्याय देखील देतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना ती त्यांच्या आवडीनुसार बदलता येतात. टीव्हीप्रमाणेच, सेट-टॉप बॉक्सवरील या बटणांनाही विशिष्ट कार्ये नेमून दिलेली असतात. त्यांचा वापर भाषा सेटिंग्ज बदलण्यासाठी, सशुल्क सेवांची सदस्यता घेण्यासाठी आणि इतर मेन्यू उघडण्यासाठी केला जाऊ शकतो. अनेक कंपन्या त्यांच्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पर्यायदेखील देतात.
बटणे विशिष्ट आकार आणि उठावदार वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेली असतात. ज्यामुळे वापरकर्ते रिमोटकडे न पाहताही अगदी अंधारात किंवा कमी प्रकाशातही योग्य बटण दाबू शकतात. व्हॉल्यूम बटणे सहसा लांबट किंवा ‘रॉकर’ स्वरूपाची असतात, तर चॅनेल बदलण्यासाठीची बटणे वेगळ्या आकाराची सामान्यतः गोल किंवा बाणाच्या आकाराची असतात. जेणेकरून या दोन्ही प्रकारच्या बटणांमध्ये गोंधळ होऊ नये. मध्यभागी असलेला बटणांचा समूह, जो गोलाकार किंवा दिशादर्शक मांडणीत असतो, तो मेनूमध्ये नेव्हिगेट करणे सोपे करतो. बटणांचे आकार, त्यांची जागा आणि मांडणी ही उत्पादक कंपनी आणि टीव्हीच्या विशिष्ट मॉडेलनुसार वेगवेगळी असू शकते.