जगातील सर्वात जास्त अल्कोहोल असलेले हे मद्य, तब्बल 90 टक्के अल्कोहोल पण..

मद्यप्राशन केल्याने नशा चढते. मात्र, तुम्ही किती अल्कोहोल असलेले मद्य घेत आहात, त्यावर सर्व गणित अवलंबून आहे. 90 टक्के अल्कोहोल असलेलेही मद्य आज बाजारात मिळते. चला जाणून घेऊयात कोणत्या मद्यात सर्वात जास्त अल्कोहोल असते.

जगातील सर्वात जास्त अल्कोहोल असलेले हे मद्य, तब्बल 90 टक्के अल्कोहोल पण..
alcohol
| Updated on: Oct 18, 2026 | 1:15 PM

मद्यप्राशन केल्यानंतर नशा चढते. मात्र, अनेकदा लोक म्हणतात की, दारू चढतच नाहीत. या पेयात अल्कोहोल किती आहे, यावर नशा चढण्याचे समीकरण आधारीत असते. बिअरमध्ये 4 ते 8 टक्के अल्कोहोल असते. वाइनमध्ये साधारणपणे 10 ते 15 टक्के अल्कोहोल असते. रम, व्हिस्की आणि व्होडका यात अल्कोहोलचे प्रमाण अधिक असते. त्यात जवळपास 35 ते 45  टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. मद्यप्रकारांमध्ये स्पिरिटस रेक्टिफिकोवानी सर्वात पहिल्या स्थानावर आहे. हिचे उत्पादन पोलंडमध्ये होते. यात अल्कोहोल अत्यंत जास्त प्रमाणात असते. त्यात 96 टक्के अल्कोहोल असते. थोडक्यात काय तर त्यात 100 मिलिलिटरमध्ये तब्बल 96 मिनिमिटर इथेनॉल असते.

स्पिरिटस रेक्टिफिकोवानी हिला 192  प्रूट स्पिरिट नावानेही ओळखले जाते. त्यात 100 मिलिलिटर द्रवामध्ये 96 मिलिलिटर इथेनॉल असते. व्होडका आणि व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण हे सुमारे 40 टक्के असते. हे सामान्य मद्यपेयाप्रमाणे थेट पिले जाऊ शकत नाही. पिण्यायोग्य त्याला मानले जात नाही. याचा वापरत विविध उत्पादनात गेला जातो.

Loading...

हे मद्य थेट पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. इतर उत्पादनात याचा वापर करण्याचा आणि थेटपणे न पिण्याचा सल्ला विक्रेत्यांकडून दिला जातो. युनायटेड स्टेट्समधील एव्हरक्लिअर 190 हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक मद्य प्रकारांच्या यादीतील एक प्रमुख नाव आहे. यात 95 टक्के एबीव्ही म्हणजेच 190 प्रूफ इतके अल्कोहोल असते. हे प्रमाण स्पिरिटसपेक्षा केवळ एक टक्क्याने कमी आहे. गोल्डन ग्रेन 190 हे देखील सुमारे 95 टक्के एबीव्ही असलेल्या मद्यांच्या श्रेणीत येते.

90 टक्के अल्कोहोल असलेले मद्य थेटपणे पिणे अत्यंत घातक ठरू शकते उत्पादन करणाऱ्या कंपन्या देखील हे मद्य थेट न पिण्याचा सल्ला देतात. थेट सेवन केले तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे आपल्या शरीरात काही वेळातच मोठ्या प्रमाणात इथेनॉल प्रवेश करू शकते. ज्यामुळे विषबाधा होण्याचे धोका अधिक वाढतो. जात जीव जाण्याचीही शक्यता असते. यामुळे 90 टक्के अल्कोहोल असलेले मद्य पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. भारतात मद्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us