जाणून घ्या त्या सवयींबद्दल, ज्या तुम्ही स्वतः बदलाल तर त्याचा फायदा पृथ्वीलाही होईल!

Good Habits For Planet: आपल्यापैकी अनेकांना काही सवयी अशा असतात ज्यामध्ये आपण बदल केला, तर आपल्या जीवना सोबतच त्याचा चांगला प्रभाव पृथ्वीवर सुद्धा पडेल आणि पृथ्वीचे आरोग्य देखील सुधारण्यास आपण हातभार लावण्यास मदत करू.

जाणून घ्या त्या सवयींबद्दल, ज्या तुम्ही स्वतः बदलाल तर त्याचा फायदा पृथ्वीलाही होईल!
तुम्हीही काही सवयी पृथ्वीला वाचवण्यासाठी बदलायला हव्यात!
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 8:11 PM

गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत की पृथ्वीवरील लोकसंख्या (Population On Earth) आणि वेगवेगळ्या शोधांमुळे, मानवाने केलेल्या प्रगतीमुळे पृथ्वीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. आता पर्यावरण सिस्टीम (Environment On Earth) मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये हवामान, ग्लोबल वार्मिंग यामध्ये आपल्याला खूप मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. पृथ्वीवर आपण राहत असल्यामुळे तिचे जतन करणे तिच्या आरोग्याबाबत आपण काळजी घेणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. पृथ्वीच्या आरोग्याची (Good Habits For Earth) काळजी घेऊन आपण आपलेच भविष्य सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही सवयींमध्ये आवश्यक तो बदल करण्याची आवश्यकता आहे, ज्याद्वारे आपण पृथ्वीचे आरोग्य चांगले ठेवू शकतो. त्यामुळे काही सवयी आजपासूनच बदलण्याची आपल्याला आवश्यकता आहे.

अशातच आज आपण जाणून घेऊया की त्या कोणकोणत्या सवयी आहेत ज्या तुम्ही आजच बदलण्याची आवश्यकता आहे. अशा सवयी ज्या तुम्ही बदलल्यामुळे पर्यावरणाच्या हितासाठी हातभार लावला जाईल. सोबत जाणून घेऊया की तुम्ही या सवयी बदलल्यामुळे कशा पद्धतीने आपण पृथ्वीसाठी फायदेशीर ठरू शकतो आणि पर्यावरणबाबत असणारी आपली जबाबदारी पूर्ण करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या सवयीबाबत ज्या पृथ्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत.

नॉनव्हेज खाणे कमी करणे

डी डब्ल्यू च्या एका रिपोर्ट नुसार जगभरामध्ये ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन हे 14 टक्के शेती मधून होते. जनावरांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात मिथेन बाहेर पडत असतो. त्यामुळे शाकाहारी बनवून आपण पर्यावरणास मोठ्या प्रमाणात हातभार लावू शकतो जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर हे खाण्याचे प्रमाण तुम्ही नक्की कमी केले पाहिजे जेणेकरून तुम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावू शकता.

वाहनांचा वापर कमी करणे

कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे उत्सर्जन हे प्रदूषण वाढीसाठी जबाबदार आहेत. यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत की कमी डिझेल आणि पेट्रोल गाड्यांचा वापर आपल्याकडून केला जावा आणि इलेक्ट्रिक गाड्यांकडे आपला ओढा असला पाहिजे. जेणेकरून आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावू शकतो.

विमानद्वारे कमी प्रवास करणे

मनुष्य जितका कार्बन-डाय-ऑक्‍साईड उत्सर्जित करतो त्यापैकी 2.5% वाटा हा फक्त विमानांचा असतो. विमानाद्वारे होणाऱ्या कार्बन-डाय-ऑक्‍साईड उत्सर्जनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे कि हवाई प्रवास यात्रा कमीत कमी केली जाईल.

मोबाईलचा अतिरिक्त वापर न करणे

काय तुम्हाला माहिती आहे का टीव्ही च्या तुलनेत मोबाईलचा जास्तीत जास्त वापर आरोग्यास धोकादायक असतो. त्या शिवाय इंटरनेटवर जास्त प्रमाणात व्हिडीओ बघणे कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन वाढण्यास मदत करते. याचे कारण हे आहे की डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये 4 टक्के कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन होते. यातील महत्त्वाची गोष्ट अशी की डिजिटल टेक्नॉलॉजी या वाढीस जास्तीत जास्त हातभार लावत आहेत. लवकरच डिजिटल टेक्नोलॉजी 4 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाइलच्या तुलनेत टिव्हीचा वापर किंवा त्यावर व्हिडिओ बघणे तुलनेने अधिक फायदेशीर आहे.

गुंतवणुकीचे खास ध्यान असावे

तुम्ही विचार करत असाल की अखेर गुंतवणुकीमुळे प्रदूषणावर काय फरक पडत असेल खरतर गुंतवणूक करताना तुम्ही त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. ज्या कंपन्या वायुप्रदूषणसारख्या समस्यांना आधार लावतात, म्हणून पृथ्वीसाठी आणि पर्यावरणासाठी चांगले काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

संबंधित बातम्या :

Hijab Controversy : देशात हिजाबवरून मोठा बवाल, कोणत्या देशात हिजाब बॅन? कुठे काय नियम?

हिजाब आणि बुरखा यांच्यात काय फरक आहे? मराठी मुली पण हिजाब घालतात? खरंच?

अक्कल दाढ आल्यावर खरंच अक्कल येते? अक्कल दाढेच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.