या देशातील मुस्लीम मोठ्या संख्येन इस्लाम सोडून का स्वीकारतायत दुसरा धर्म? धक्कादायक कारण समोर

या देशातील मुस्लीम लोकं चक्क त्यांचा धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारत आहेत. या देशात मोठ्या संख्येन मुस्लीम इस्लाम सोडत आहे. याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.  

या देशातील मुस्लीम मोठ्या संख्येन इस्लाम सोडून का स्वीकारतायत दुसरा धर्म? धक्कादायक कारण समोर
Muslims leaving Islam in large numbers in America
Image Credit source: Meta AI
| Updated on: May 03, 2025 | 6:55 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे.भारताने पाकिस्तानशी संबंधित अनेक गोष्टींवर थेट बंदी घातली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी लोकांना पुन्हा पाकिस्तानात जाण्यासाठीही आदेश देण्यात आला आहे. पण या सर्व घडामोडींदरम्यान अमेरिकेतील एका अहवालाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

या देशात भारतापेक्षा इस्लाम सोडणाऱ्या लोकांची संख्या खूप 

एका सर्वेक्षणानुसार, काही मुस्लीम बहुल देशांमध्ये भारतापेक्षा इस्लाम सोडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. तुर्की, जो इस्लामिक बहुल देश आहे, तेथे इस्लाम धर्मात जन्मलेले सुमारे 4 टक्के लोक आता स्वतःला मुस्लीम मानत नाहीत. त्या तुलनेत, भारतात ही संख्या फक्त 1 टक्के आहे.

या देशात मुस्लिमांनी इस्लाम सोडून दुसरा धर्म स्वीकारला

पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरच्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेतही मुस्लीम लोकसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामागील मुख्य कारण नैसर्गिक घट नसून धर्म परिवर्तन आहे. अहवालानुसार, 25% पेक्षा जास्त मुस्लिमांनी इस्लाम सोडून दुसरा धर्म स्वीकारला आहे किंवा नास्तिक बनले आहेत. अमेरिकेसारख्या विकसित देशात हा ट्रेंड एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक बदल दर्शवतो. अहवालानुसार, अमेरिकेतील मुस्लीम समुदायाची एकूण लोकसंख्या वेगाने वाढण्याऐवजी स्थिर होत आहे आणि याचे मुख्य कारण धर्मांतर आहे. हे लोक इस्लाम सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहे किंवा थेट नास्तिक होत आहेत.

सर्वात धक्कादायक आकडेवारी या देशाची 

भारतात धर्मांतर हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. काहीवेळा तो चिंतेचा विषयही बनताना दिसतो. पण युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये मोठ्या संख्येने लोक आपला धर्म सोडून नास्तिक होत आहेत किंवा दुसऱ्या धर्माचे पालन करू लागले आहेत. सिंगापूरमध्येही सुमारे 30 टक्के मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडला आहे, जो एक मोठा आकडा मानला जातो. परंतु या प्रकरणात सर्वात धक्कादायक आकडेवारी अमेरिकेची आहे, जिथे सुमारे 23 टक्के मुस्लिमांनी इस्लामचा त्याग केला आहे.

भारतात धर्मांतर हा विषय संवेदनशील आणि थोडा वादाचाच राहिलेला आहे. पण इतर देशांमध्ये तो वैयक्तिक निवडीचा भाग बनला आहे.
येणाऱ्या काळात हा ट्रेंड आणखी वेगाने बदलू शकतो.