तुमच्या हाताला दोन अंगठे आहेत? तर मग जाणून घ्या तुमचं नशीब आणि भविष्य

| Updated on: Jun 04, 2021 | 10:47 AM

तुम्ही अभिनेता ऋत्विक रोशनच्या हाताला दोन अंगठे पाहिले असतील. इतरही अनेक सामान्य लोकांनाही असे दोन अंगठे जन्मताच असतात. अशा लोकांचं नशीब आणि भविष्य नेमकं कसं असतं? जाणून घेऊया....

तुमच्या हाताला दोन अंगठे आहेत? तर मग जाणून घ्या तुमचं नशीब आणि भविष्य
Double Thumb
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मानुसार प्रत्येक माणसाचं आयुष्य त्याच्या जन्मासोबत ठरलेलं असतं. अर्थातच याचा अर्थ असा नाही की, नियतीवर सगळं सोडून देऊन ऐतखाऊ व्हावं. मेहनतीनं नशीबही बदललं जाऊ शकतं हेही तितकच खरं. आपल्या शरीरात काही वेगळेपण असेल तर आपलं भविष्य त्याच्याशी जोडलं गेल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अंगठ्याला लागुनच दुसरा अंगठाही आला असेल तर त्याचा नेमका अर्थ काय ते पाहुयात… (Why Does Double thumb polydactyty says About future)

ऋत्विक रोशनसारखे दोन अंगठे असणाऱ्या लोकांचं नशीब नेमकं कसं असतं? त्यांच्यावर नियती प्रसन्न असते की नाही? दोन अंगठे पाहिल्यानंतर आपल्याला असे अनेक प्रश्न पडू शकतात. त्याची उत्तरं घरातली ज्येष्ठ मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं देतात. आज आम्हीही तुम्हाला अशा शारिरीक स्थितीचं आकलन करुन नवं काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत.

कसं असतं दोन अंगठेवाल्यांचं जीवन?

ज्यांना कुणाला दोन अंगठे असतात त्यांच्यासाठी ही गोष्ट शुभ मानली जाते. त्यांना मान सन्मान मिळतो. पैसाही मिळणं नशीबात असतं. दोन अंगठे असणाऱ्यांना भाग्यवान मानलं जातं. कारण अशा लोकांना बहुतांश गोष्टी सहजपणे मिळतात. फार संघर्ष करावा लागत नाही. असे अंगठे असणारे लोक बुद्धीमान असल्याचही लक्षात आलेलं आहे.

विशेष म्हणजे महिलांनाही असे दोन अंगठे असतील तर त्यांच्यासाठीही ते शुभच मानले जातात. ही मंडळी मेहनती असतात. स्वत:चं काम ते इमानदारीनं करतात. हे लोक टिकाटिप्पणी करण्यातही माहिर असतात. त्यामुळे अशा लोकांपासून इतर माणसं अंतर ठेवतात.

विज्ञान काय सांगतं?

ज्यांना दोन अंगठे असतात त्याला पॉलीडेक्टली म्हटलं जातं. kidshealth.org च्या एका रिपोर्टनुसार दोन अंगठे जन्मजात असतात. काहींना ते एकाच हाताला असतात तर काहींच्या दोन्ही हातांना असे दोन अंगठे येतात. त्यातही एक अंगठा मोठा असतो म्हणजे त्याचा विकास झालेला असतो तर दुसरा मात्र लहान असतो. अविकसित राहून जातो. काहींचा दुसरा अंगठा हा सरळही होत नाही. वैज्ञानिक माहितीनुसार अनेकांना असे दोन अंगठे अनुवांशिक पद्धतीनं मिळालेले असतात.

(Why Does Double thumb polydactyty says About future)

हे ही वाचा :

PHOTO | भारताच्या नकाशामध्ये दिसणाऱ्या या बारीक लाईनबाबत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

एलआयसीकडे तुमचे पैसे आहेत, पण तुम्हाला ठाऊक नाही; जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुमची रक्कम

एलपीजीपासून अधूनमधून दुर्गंध का येतो? जाणून घ्या यामागील नेमके कारण