कायद्याच्या 64 वर्षांनंतरही हुंडाबळीच्या घटना का नाही थांबत? कायद्यात काय आहेत तरतुदी?
Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू झाला. हा प्रकार हुंडाबळीचा म्हटला जात आहे. हुंडाबळीचा कायदा झाला पण हुंडाबळी थांबत नाही. समाजातील हुंडाबळी रोखण्यासाठी अनेक पावले उचलावे लागतील. नुसता कायदा करुन चालणार नाही, त्यासाठी समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे.

Vaishnavi Hagawane Death Case : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील विवाहित वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रकार हुंडाबळीचा असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिचा मानसिक, शारीरिक छळ करून तिची हत्या सासरच्या लोकांनी केल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी केला. वैष्णवीला लग्नात फॉर्च्यूनर कार, ५१ तोळे सोने, चांदीची भांडी दिली होती. त्यानंतरही हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचे तिच्या आई-वडिलांचा आरोप आहे. जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण न झाल्याने वैष्णवीचा छळ होत होतो, असे म्हटले जात आहे. राज्यात हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. त्यानंतर हुंडाबळीच्या घटना का घडत असतात… ...