AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंघोळीआधी वारंवार घड्याळ का पाहतात इस्त्रायली? युद्धात ‘शॉवर ॲप’ची चर्चा

इस्रायली नागरिक सततच्या हल्ल्यांच्या छायेत जीवन जगत आहेत. अंघोळीसारख्या सामान्य कामासाठी ते 'कॅन आय शॉवर' (Can I Shower) ॲप वापरतात. हे ॲप रॉकेट हल्ल्यांची शक्यता पाहून अंघोळीसाठी सुरक्षित वेळ सांगते. युद्धजन्य परिस्थितीत दैनंदिन जीवन जगणे किती कठीण झाले आहे, हे यातून दिसते. तंत्रज्ञान सुरक्षेसाठी कसे महत्त्वाचे ठरते, हे देखील स्पष्ट होते.

अंघोळीआधी वारंवार घड्याळ का पाहतात इस्त्रायली? युद्धात ‘शॉवर ॲप’ची चर्चा
युद्धात ‘शॉवर ॲप’ची चर्चा Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 09, 2026 | 1:30 PM
Share

सतत तणाव आणि हल्ल्यांच्या छायेत जगणाऱ्या देशात रोजचं साधं आयुष्यही कठीण होतं. इस्रायलमधील नागरिकांची काहीशी अशाच परिस्थिती झाली आहे. इस्रायलचे लोक अंघोळीसारख्या साध्या कामासाठीही मोबाईल अ‍ॅपचा आधार घेत आहेत. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. इस्त्रायलमध्ये सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहमी धोक्याच्या छायेखाली असलेला आणि सध्या इराणसोबत थेट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर असलेला इस्त्रायल देशातील नागरिक एका खास मोबाईल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत सामान्य आयुष्य जगणंही मोठं आव्हान बनलं आहे.

इस्त्रायलमध्ये अंघोळीसाठीही अ‍ॅप

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाइट्समुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. दैनंदिन गरजांसाठी असंख्य अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण अंघोळीसारख्या मूलभूत गरजेसाठीही अ‍ॅप वापरावा लागेल, असा विचार कदाचित कोणी केला नसेल. मात्र इस्त्रायलमध्ये हे प्रत्यक्षात घडत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आकाशातून मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका कायम असतो. त्यामुळे न्हाण्यासारखं साधं कामही कधी कधी धोकादायक ठरू शकतं. यावर उपाय म्हणून इस्त्रायलमध्ये “Can I Shower” (मी आत्ता आंघोळ करू शकतो का?) नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलं आहे. हे प्लॅटफॉर्म नागरिकांना कोणता वेळ तुलनेने सुरक्षित आहे, याची माहिती देतं, जेणेकरून ते अंघोळीसारखं साधं कामही कमी धोका पत्करून करू शकतील.

आता बॉम्बपासून वाचण्यासाठी

युद्धाच्या या काळात अनेक प्रकारच्या वेबसाइट्स आणि डिजिटल साधनं समोर आली आहेत. मात्र ‘Can I Shower’ या वेबसाइटने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. इराणकडून होणाऱ्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्यामुळे ही वेबसाइट लोकांना सुरक्षित वेळ कोणती आहे हे सांगते. यामुळे लोकांना निर्धास्तपणे अंघोळ करता येते आणि अंगावर साबण लावलेला असतानाच अचानक बॉम्बपासून वाचण्यासाठी धाव घ्यावी लागेल, अशी परिस्थिती टाळण्यास मदत होते.

ही वेबसाइट नेमकी कशी काम करते?

‘Can I Shower’ ही वेबसाइट रॉकेट हल्ल्यांचे पॅटर्न आणि संभाव्य अलर्ट यांचे विश्लेषण करून अंघोळ करण्यासाठी किती सुरक्षित वेळ आहे, याचा रिअल-टाइम अंदाज देते. यासाठी ती आधीच्या हल्ल्यांचा ऐतिहासिक डेटा आणि सध्याच्या इराणी हल्ल्यांची परिस्थिती एकत्र करून धोका किती आहे, याचे मूल्यांकन करते. मग प्रश्न पडतो की सुरक्षित वेळ नेमकी कोणती? उपलब्ध सध्याच्या आकडेवारीनुसार ही वेबसाइट सकाळी 5 वाजून 30 मिनिटांचा वेळ अंघोळीसाठी तुलनेने सर्वात सुरक्षित असल्याचे सांगते, कारण त्या वेळेत हल्ल्यांची शक्यता सर्वात कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळेच इस्रायलचे नागरिक अंघोळीपूर्वी वारंवार या अॅपकडे पाहत असतात.

सोशल मीडियावर चर्चा

या उपक्रमाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने ‘X’ वर लिहिले, “ऐकायला हे थोडं मजेशीर वाटू शकतं, पण प्रत्यक्षात ते खूप उपयोगी आहे. टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर धावणं खूप अवघड असतं आणि बाथरूममध्ये पाणी सुरू असताना सायरनचाही आवाज नीट ऐकू येत नाही.” तर आणखी एका यूजरने स्वतःचा अनुभव सांगताना लिहिले, “माझ्यासोबत असं आधी घडलं आहे. अंगावर साबण लावलेला असताना शेल्टरकडे धाव घेणं अजिबात सुखद अनुभव नसतो.”

इतर डिजिटल उपायही सक्रिय

तणाव वाढत असताना इस्त्रायलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक डिजिटल अ‍ॅप्स मदतीला धावत आहेत. युद्धाच्या या तणावपूर्ण परिस्थितीला तंत्रज्ञानाच्या मदतीने हाताळण्याचा प्रयत्न देशाने केला आहे. ‘Can I Shower’ व्यतिरिक्त इस्त्रायली सैन्याचे ‘Home Front Command’, ‘Bomb Shelter Locator’ आणि बॉम्ब शेल्टरमध्ये लोकांना एकमेकांशी जोडणारे ‘Hooked’ यांसारखी अ‍ॅप्सही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.

1. होम फ्रंट कमांड अ‍ॅप :

हे इस्त्रायली सैन्याचे अधिकृत अ‍ॅप असून ते GPS च्या मदतीने वापरकर्त्याचे लोकेशन ओळखते आणि रॉकेट किंवा दहशतवादी हल्ल्याची शक्यता असताना अचूक अलर्ट पाठवते.

2. बॉम्ब शेल्टर लोकेटर :

हे एक इंटरॅक्टिव्ह मॅप आहे, ज्यामध्ये जवळपास 20 हजार अधिकृत बॉम्ब शेल्टर्सची माहिती दिली आहे. तसेच त्या शेल्टरपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा आणि जलद मार्गही यात दाखवला जातो.

3. पर्पल वेस्ट अ‍ॅप :

‘Purple Vest’ हे अ‍ॅप विशेषतः वृद्ध आणि दिव्यांगांसाठी तयार करण्यात आले आहे. अलर्ट मिळाल्यानंतर स्वयंसेवकांची टीम अशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करते.

4. हूक्ड अ‍ॅप :

‘Hooked’ हे अ‍ॅप युद्धाच्या कठीण काळात लोकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवण्यास आणि एकमेकांशी संवाद साधण्यास मदत करते.

दरम्यान, इराणकडून होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये वारंवार सायरन वाजत आहेत. नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वारंवार बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेत आहेत. तेल अवीव शहरातही अनेक भागांत शांतता आणि ओसाड वातावरण दिसत आहे. इराणी मिसाइल आणि रॉकेट्सना रोखण्यासाठी इस्त्रायलचे एअर डिफेन्स सिस्टिम सतत सक्रिय आहेत आणि शहरात अनेक स्तरांवर संरक्षण व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दुसरीकडे, इस्त्रायलही इराण आणि लेबनानमध्ये हवाई हल्ले करत आहे.

अमेरिका-इस्त्रायल लष्कराच्या कारवाईनंतर इराणनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत इराणमध्ये किमान 1230 जण, लेबनानमध्ये 100 हून अधिक, तर इस्त्रायलमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमधील मिनाब येथे एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. इस्त्रायली सैन्याच्या माहितीनुसार, इराणने अलीकडील हल्ल्यांमध्ये क्लस्टर युद्धसामग्रीने सज्ज बॅलिस्टिक मिसाइल्सचा वापर केला असून या संघर्षात अशा प्रकारच्या शस्त्रांचा हा पहिलाच मोठा वापर मानला जात आहे.

Follow Us
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण