समुद्र सपाटीपासून किती उंच आहे स्टेशन, का लिहिली जाते ही माहिती?

तुम्हाला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लावलेला तो पिवळा बोर्ड नेहमी दिसतच असेल हो ना? रेल्वे स्टेशनवर गेल्यावर प्लॅटफॉर्मवर बोर्ड लावलेला दिसला असेल. जो पिवळ्या रंगाचा असतो. दोन्ही बाजूला रेल्वे स्थानकाचे नाव लिहिलेले आहे. हे नावही वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलं जातं.

समुद्र सपाटीपासून किती उंच आहे स्टेशन, का लिहिली जाते ही माहिती?
Height above sea level
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 22, 2023 | 1:07 PM

मुंबई: भारतात प्रवास करायचं म्हटलं तर रेल्वे सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. रेल्वेसारखा सुरक्षित प्रवास कुठचा नाही. खूप स्वस्तात आपण रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो. खूप स्वस्तात जायचा विचार केला तर उत्तम साधन म्हणजे रेल्वे. रेल्वेचे सर्वसाधारण भाडे पाहिले तर प्रति किलोमीटर काही पैसे येतात. म्हणजे एका रुपयात तुम्ही अनेक किलोमीटर जाऊ शकता. प्रवासाचा खर्च कमी असतो, त्याशिवाय आणखी एक फायदा म्हणजे आपण वेळेत त्याठिकाणी पोहोचतो.

कधी तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वे स्थानकावर वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे लिहिलेली असतात. अनेक आपल्या उपयोगाचे आहेत आणि अनेक आपल्या उपयोगाचे नाहीत, जे वाचून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक खास माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी आवश्यक नसून तुम्ही ज्या ट्रेनमध्ये जात आहात त्या ट्रेनच्या ड्रायव्हरसाठी खूप महत्वाची आहे.

तुम्हाला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लावलेला तो पिवळा बोर्ड नेहमी दिसतच असेल हो ना? रेल्वे स्टेशनवर गेल्यावर प्लॅटफॉर्मवर बोर्ड लावलेला दिसला असेल. जो पिवळ्या रंगाचा असतो. दोन्ही बाजूला रेल्वे स्थानकाचे नाव लिहिलेले आहे. हे नावही वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलं जातं. यापैकी एक भाषा इंग्रजी आहे, इतर दुसरी भाषा नेहमी जागेनुसार बदलते. महाराष्ट्रात असेल तर मराठी, गुजरातमध्ये असेल तर गुजराती.

प्लॅटफॉर्मवरील स्थानकाचे नाव असलेल्या फलकाच्या तळाशी त्या स्थानकाची उंची समुद्रसपाटीपासून किती आहे ते लिहिलेलं असतं. हे ट्रेनच्या ड्रायव्हरसाठी खूप महत्वाचे आहे. समुद्रसपाटीच्या या उंचीवरून लोको पायलटला आणखी चढाई आहे की उतार याचा अंदाज येऊ शकतो. त्यानुसार गाडीचा ड्रायव्हर इंजिनचा वीजपुरवठा आणि वेग ठरवतो. जेणेकरून ट्रेन सहज डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकेल.