जॉइंट होमलोनवर असे वाचवू शकता 7 लाखापर्यंतचे टॅक्‍स, खूप कमी लोकांना माहितीये फायदे

नवीन घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्यासाठी लागणारा फायनान्स हा बँकेकडूनच घेतला जातो. कारण गृहकर्ज घेतल्याशिवाय सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे गृहकर्ज घेताना अनेकदा दोन लोकांच्या नावावर ते घेतले जाते. कारण एकाच्या नावावर मिळत नाही. अशा परिस्थितीत याचे फायदे देखील तुम्हाला माहित हवेत.

जॉइंट होमलोनवर असे वाचवू शकता 7 लाखापर्यंतचे टॅक्‍स, खूप कमी लोकांना माहितीये फायदे
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 6:21 PM

Home Loan : तुम्ही घर घेण्यासाठी कर्ज घेणार असाल तर संयुक्त गृहकर्ज घेण्याचा प्रयत्न करा. पत्नी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत तुम्ही संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता. याचा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला ते सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळू शकते. दुसरा मोठा फायदा म्हणजे तुम्ही संयुक्त कर्जावर चांगले कर लाभ घेऊ शकता. पती-पत्नीने एकत्रित गृहकर्ज घेतल्यास ७ लाख रुपयांपर्यंतचा आयकर वाचवू शकतो.

7 लाख रुपये वाचवू शकता.

संयुक्त गृहकर्ज घेतल्यास दोन्ही कर्जदार आयकर कायद्याच्या कलम 80C आणि कलम 24(b) अंतर्गत आयकर लाभांसाठी क्लेम करू शकतात. कलम 80C अंतर्गत, दोन्ही कर्जदार मूळ रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतात. कलम 24(b) अंतर्गत, दोघेही रु. 2 लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर कपातीचा दावा करू शकतात. अशाप्रकारे, अर्जदार कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजावर जास्तीत जास्त 3.50 लाख रुपये वजा करू शकतो आणि संयुक्त गृहकर्जाच्या बाबतीत, दोन्ही मिळून जास्तीत जास्त 3.50-3.50 म्हणजे एकूण 7 लाख रुपये वाचवू शकता.

जर दोन्ही अर्जदार मालमत्तेचे सह-मालक असतील आणि कर्जाच्या कागदपत्रांमध्ये सह-कर्जदार म्हणून नोंदणीकृत असतील तरच गृहकर्जावर 7 लाख रुपयांपर्यंतची कमाल कर सूट मिळेल. दोन्ही बाजूंनी ईएमआय भरला जात आहे. जर तुम्ही मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये मालक म्हणून नोंदणीकृत असाल, परंतु गृहकर्जाच्या कागदपत्रांमध्ये तुमचे नाव सहकर्जदार म्हणून समाविष्ट नसेल, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही कारण सहकर्जदार असण्याचा अर्थ कर्जाची परतफेड करणारा असा असतो.

संयुक्त गृहकर्जाचे फायदे

बऱ्याच वेळा लोकांना खराब क्रेडिट स्कोअर, कमी उत्पन्न किंवा इतर प्रकारचे कर्ज ते उत्पन्न गुणोत्तर यामुळे कर्ज घेण्यास अडचणी येतात. अशा वेळी संयुक्त गृहकर्ज उपयुक्त ठरु शकते. अर्जदार म्हणून तुमच्यासोबत अन्य व्यक्ती जोडून कर्ज घेण्याची पात्रता वाढते. संयुक्त कर्जामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तीची भरण्याची क्षमता चांगली असेल तर कर्ज सहज उपलब्ध होते.

एकाच कर्ज अर्जदाराला त्याच्या उत्पन्नानुसार कर्ज दिले जाते. पण संयुक्त कर्जामध्ये दोघांचे एकूण उत्पन्न गृहीत धरले जाते. अशा परिस्थितीत कर्जाच्या रकमेची मर्यादा वाढते.

जर तुम्ही महिला सह-अर्जदारासोबत संयुक्त गृहकर्ज घेतले तर तुम्हाला थोड्या कमी व्याजदराने कर्ज मिळते. महिला सह-अर्जदारांसाठी वेगवेगळे गृहकर्ज व्याजदर देतात. हा दर साधारणपणे चालू दरापेक्षा सुमारे ०.०५ टक्के (५ बेसिस पॉइंट) कमी असतो. परंतु हा लाभ घेण्यासाठी स्त्री ही संपत्तीची एकमेव किंवा संयुक्त मालक असावी लागते.

Non Stop LIVE Update
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल.
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.