नगरमध्ये लष्कराच्या हद्दीत भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटला, एकाचा मृत्यू

| Updated on: Feb 14, 2020 | 3:32 PM

अहमदनगमध्ये बॉम्ब स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. भिवा साधू गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. लष्कराच्या के के रेंज हद्दीतून आलेला बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट होऊन ही दुर्घटना झाली.

नगरमध्ये लष्कराच्या हद्दीत भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटला, एकाचा मृत्यू
Follow us on

अहमदनगर : अहमदनगमध्ये लष्कराच्या हद्दीत भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याने एकाच मृत्यू झाला.  भिवा साधू गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. लष्कराच्या के के रेंज हद्दीतून आलेला बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट होऊन (khare karjune ahmednagar blast ) ही दुर्घटना झाली. नगर तालुक्यातील खारेकर्जुने इथं ही धक्कादायक घटना घडली. (khare karjune ahmednagar blast)

के.के. रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडविण्याचा सराव चालतो. सराव संपल्यानंतर परिसरातील काही लोक नजर चुकवून इथे निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात. मात्र एक बॉम्ब जिवंत असल्याने त्याचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला.

के के रेंज परिसर हा लष्कराचा संवेदनशील भाग आहे. इथे जवानांचा युद्धाचा सराव चालतो. दरवर्षी इथे जवानांचा सराव सुरु असतो. मोठमोठे रणगाडे, तोफा, बॉम्बस्फोटांचा मारा केला जातो. या सरावानंतर फुटलेले बॉम्ब, गोळ्यांची आवरणे, निकामी शस्त्र किंवा तत्सम भंगार गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिक या लष्कराच्या हद्दीत घुसतात. तसाच प्रकार करणं हे जीवावर बेतलं.  भंगार गोळा करुन, ते विकण्यासाठी स्थानिक नागरिक नजर चुकवून लष्करी हद्दीत घुसतात. भंगार गोळा करत असताना तिथे एक जिवंत बॉम्ब होता. तो अचानक फुटल्याने भिवा गायकवाड यांचा मृत्यू झाला.

यापूर्वीच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

यापूर्वी जुलै 2019 मध्येही असाच स्फोट होऊन खारेकर्जुने याच गावातील दोघांना आपला जीव गमवावा लागला होता.  अहमदनगरमधील लष्कराच्या के के रेंज हद्दीमध्ये स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. अक्षय नवनाथ गायकवाड वय 19 आणि संदीप भाऊसाहेब तिरवडे वय 32 अशी मृतांची नावे होती. भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याने हा स्फोट झाला होता. दोघेही मृत खारेकर्जुने गावचे रहिवासी होते.

संबंधित बातम्या  

नगरमध्ये लष्कराच्या हद्दीत भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटला, दोघांच्या चिंधड्या