Nashik| 100 कोटींचा TDR Scam; महाालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत, ऐन निवडणुकीत धुरळा!

| Updated on: Nov 23, 2021 | 2:59 PM

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेतील 100 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याच्या भुताने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याप्रकरणी महापचालिका आयुक्त कैलास जाधव यांनी उच्चस्तरीय समिती चौकशी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.

Nashik| 100 कोटींचा TDR Scam; महाालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत, ऐन निवडणुकीत धुरळा!
नाशिक महापालिका.
Follow us on

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेतील 100 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याच्या भुताने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याप्रकरणी महापचालिका आयुक्त कैलास जाधव यांनी उच्चस्तरीय समिती चौकशी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांनी या घोटाळ्याबाबत महापालिका आयुक्तांकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे दिसत आहे.

असा घडला घोटाळा

नाशिक महापालिकेत 15,630 चौरस मीटर क्षेत्राचा टीडीआर महापालिकेने घेतला होता. त्यासाठी सिन्नर फाटा येथे असलेली जागा नाशिकरोडच्या बिटको चौकात असल्याचे दाखवली गेली. या जागेचा सरकारी भाव 6, 900 रुपये होता. मात्र, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हाच दर 25,100 प्रतिचौरस मीटर लावण्यात आला. त्यातून 100 कोटींचा ‘टीडीआर’ पदरात पाडून घेतला. या घोटाळ्याप्रकरणी अॅड. शिवाजी सहाणे, सलीम शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर नगरविकास विभागाकडे तक्रार करून त्यांच्यामार्फत चौकशी लावली होती. विशेष म्हणजे महापालिकेने प्रशासन उपायुक्तांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी केली. तसेच शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी पुन्हा याबाबत तक्रार केल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.

निवडणुकीत गाजणार

नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महापालिकेतील बहुचर्चित अशा 100 कोटी रुपयांच्या टीडीआर प्रकरणाच्या घोटाळ्याचे भूत बाहेर निघाले आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. हे प्रकरण येत्या निवडणूक गाजणार हे नक्की. यावरून आरोप-प्रत्यारोपाची राळ उठेल. याचा फायदा कोणाला होईल, हे समोर येईलच. मात्र, चौकशीनंतर पुन्हा चौकशी, असे किती दिवस चालणार, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण होत आहे.

हे मुद्देही गाजणार

नाशिक महापालिकेत टीडीआर घोटाळ्याचा मुद्दा तरी गाजेलच. सोबतच रस्ते दुरस्तीच्या कामांचा प्रश्नही गाजू शकतो. या प्रकरणांवरून सत्ताधारी भाजपला भाजपचे आमदार आणि नगरसेवकांनीच धारेवर धरले होते. शिवाय शहरात यंदा साथीच्या आजारांचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. यावारूनही सत्ताधाऱ्यांना सत्ताधारी लोकांनीच धारेवर धरले. हे पाहता रस्त्यांसोबत इतर प्रश्नही टीडीआर घोटाळ्यासोबत गाजू शकतात.

इतर बातम्याः

विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे नाशिकमध्ये अनावरण; भुजबळ नॉलेज सिटीमध्येही तयारी जोरात!

अमरावती दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी; सरकार नागपूरला अधिवेशन घ्यायला घाबरले, असा हल्लाबोल