चॅनल बदललं नाही म्हणून मुलाची गळा आवळून हत्या

चंदीगड : टीव्हीवरील चॅनल बदललं नाही म्हणून एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मेवात येथील 14 वर्षीय राहुल खान हा त्याच्या वडील अमृत खान यांच्यासोबत गुरुग्राममध्ये राहायचा. अमृत खान हे पतौडी रोडवर असलेल्या एका आरा मशीनवर काम करतात. राहुल हा त्याच्या वडिलांसोबत त्या आरा मशीनजवळील एका खोलीत […]

चॅनल बदललं नाही म्हणून मुलाची गळा आवळून हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

चंदीगड : टीव्हीवरील चॅनल बदललं नाही म्हणून एका 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मेवात येथील 14 वर्षीय राहुल खान हा त्याच्या वडील अमृत खान यांच्यासोबत गुरुग्राममध्ये राहायचा. अमृत खान हे पतौडी रोडवर असलेल्या एका आरा मशीनवर काम करतात.

राहुल हा त्याच्या वडिलांसोबत त्या आरा मशीनजवळील एका खोलीत राहायचा. तो त्या खोलीत टीव्ही बघत बसला होता. तेव्हा तिथे काम करणारा उदय मंडल आला. उदयने राहुलला टीव्हीवरील चॅनेल बदलण्यास सांगितले. पण, राहुलने चॅनल बदलण्यास नकार दिला. यावरुन राहुल आणि उदयमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा तिथे काम करणाऱ्या इतर कामगारांनी या दोघांमधील वाद मिटवला.

मात्र, उदय मंडलचा राग शांत झालेला नव्हता. राहुलने त्याचं ऐकलं नाही, चॅनल बदललं नाही, याचा राग मनात धरुन उदयने टोकाचे पाऊल उचललं. रात्री राहुल झोपलेला असताना उदय त्याच्या जवळ गेला आणि झोपेतच त्याचा गळा आवळला. यामध्ये राहुलचा मृत्यू झाला. याबाबत राहुलच्या घरच्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी उदयला अटक केली. जिल्हा न्यायालयाने सध्या उदयला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

VIDEO : 

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.