गंगा जमुना वेश्यावस्ती हटवा, 51 फुटी गुढी उभारुन मागणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नागपूर: राज्यभरात गुढीपाडव्याच्या उत्साह आहे. विविध ठिकाणी शोभायात्रांमधून अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. नागपुरातही आज अनोख्या उद्देशासाठी 51 फुटांची गुढी उभारण्यात आली. गंगा जमुना परिसरातील वेश्यावस्ती हटवण्याची मागणी करण्यासाठी, परिसरातील लोकांनी आज 51 फुटांची गुढी उभारली. पूर्व नागपुरात गंगा जमुना ही 150 वर्षे जुनी वेश्यावस्ती आहे. पण या वस्तीच्या परिसरात सर्वसामान्य लोकंही राहतात. वेश्यावस्तीमुळे सामान्य […]

गंगा जमुना वेश्यावस्ती हटवा, 51 फुटी गुढी उभारुन मागणी
Follow us on

नागपूर: राज्यभरात गुढीपाडव्याच्या उत्साह आहे. विविध ठिकाणी शोभायात्रांमधून अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. नागपुरातही आज अनोख्या उद्देशासाठी 51 फुटांची गुढी उभारण्यात आली. गंगा जमुना परिसरातील वेश्यावस्ती हटवण्याची मागणी करण्यासाठी, परिसरातील लोकांनी आज 51 फुटांची गुढी उभारली.

पूर्व नागपुरात गंगा जमुना ही 150 वर्षे जुनी वेश्यावस्ती आहे. पण या वस्तीच्या परिसरात सर्वसामान्य लोकंही राहतात. वेश्यावस्तीमुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही वस्ती हटविण्याच्या मागणी स्थानिकांनी अनेकवेळा केली आहे. याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज याच परिसरात 51 फुटांची गुढी उभारण्यात आली.

वेश्यावस्ती परिसरात सातत्याने गुन्हे, अपराध, खून, मारामारी होत असते. शिवाय लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी ही वस्ती रहिवासी वसाहतीपासून दूर असावी असं स्थानिकांचं मत आहे.