जळगावच्या रुग्णालयातून 82 वर्षाची कोरोनाबाधित महिला बेपत्ता, आजींचा शोध सुरु

| Updated on: Jun 07, 2020 | 12:56 PM

भुसावळ येथील रुग्णालयातून कोरोनाग्रस्त असलेल्या 82 वर्षाच्या आजी बेपत्ता झालेल्या (Corona Patient missing Jalgaon) आहेत.

जळगावच्या रुग्णालयातून 82 वर्षाची कोरोनाबाधित महिला बेपत्ता, आजींचा शोध सुरु
Follow us on

जळगाव : भुसावळ येथील रुग्णालयातून कोरोनाग्रस्त असलेल्या 82 वर्षाच्या आजी बेपत्ता झालेल्या (Corona Patient missing Jalgaon) आहेत. आजी बेपत्ता झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आजी बेपत्ता असल्याचे रुग्णालय प्रशासनाला माहित (Corona Patient missing Jalgaon) नव्हते.

जळगाव जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष वाऱ्यावर आहे, असा आरोप आता केला जात आहे. पोलिसात तक्रार दाखल केली असून आजीचा शोध सुरू आहे. पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या नातवाने जळगाव रुग्णालयात फोन केल्यावर हा प्रकार लक्षात आला.

नुकतेच केईएम रुग्णालायतून अचानक 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सुधाकर खाडे बेपत्ता झाले होते. त्यांच्या जावयाने रुग्णालयात संपर्क केला असता ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेने केईएम रुग्णालयात खळबळ उडाली होती.

याप्रकरणानंतर 15 दिवसांनी सुधाकर खाडे यांचा मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागृहात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर केईएम रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

याप्रकरणी खाडे कुटुंबियांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील मदत केली. किरीट सोमय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. यानंतर शोधाशोधनंतर खाडे यांचा मृतदेह सापडला होता.

संबंधित बातम्या :

‘केईएम’मधून बेपत्ता वृद्ध कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सापडला, हॉस्पिटलच्याच शवागारात 15 दिवसांनी शोध

Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु