जयंती दिन विशेष : इंदिरा गांधी यांच्याबद्दल 9 रंजक गोष्टी

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. 19 नोव्हेंबर 1917 रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या. ‘गुंगी गुडिया’ म्हणून सुरुवातीला विरोधकांनी हिणवलेल्या इंदिरा गांधी यांना त्याच विरोधकांनी पुढे ‘दुर्गा’ म्हणून संबोधले. त्यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीवरुन आजही त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र, भारताच्या […]

जयंती दिन विशेष : इंदिरा गांधी यांच्याबद्दल 9 रंजक गोष्टी
Follow us on

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 101 वी जयंती आहे. 19 नोव्हेंबर 1917 रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या कन्या. ‘गुंगी गुडिया’ म्हणून सुरुवातीला विरोधकांनी हिणवलेल्या इंदिरा गांधी यांना त्याच विरोधकांनी पुढे ‘दुर्गा’ म्हणून संबोधले. त्यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीवरुन आजही त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र, भारताच्या या ‘आयर्न लेडी’ने आपलं नेतृत्त्व सक्षमपणे सिद्ध केलं. पुढे सुवर्णमंदिरात सैन्य घुसवल्याने सुरक्षरक्षकाने इंदिरा गांधी यांची हत्या केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं खमकं नेतृत्त्व म्हणून इंदिरा गांधी यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं.

इंदिरा गांधी यांच्याबद्दल 9 रंजक गोष्टी :

  1. इंदिरा गांधी यांनी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनमध्ये काही काळ शिक्षण घेतले. रवींद्रनाथ आणि नेहरु घराण्याच्या कौटुंबिक संबंध होते. इंदिरा गांधी यांचं ‘प्रियदर्शनी’ हे नाव सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी ठेवले.
  2. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर इंदिरा गांधी या दुसऱ्या पंतप्रधान होत्या, ज्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलं आहे. 19 जानेवारी 1966 रोजी पहिल्यांदा इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
  3. पंडित नेहरुंच्या निधनानंतर 1964 साली इंदिरा गांधी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर पुढे तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची धुरा देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रुपाने इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा मंत्रिपद सांभाळलं.
  4. पहिल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले.
  5. बीबीसीने 1999 साली एक पोल केला होता, त्यात इंदिरा गांधी यांच्या नावाचा समावेश होता. त्या पोलमध्ये इंदिरा गांधी यांचं नाव सरस ठरलं आणि बीबीसीने इंदिरा गांधी यांना ‘वुमन ऑफ द मिलिनियम’ असे संबोधले.
  6. स्त्री आणि पुरुषांना त्यांच्या कामाचं समान मानधन मिळालं पाहिजे, ही तरतूद घटनेत इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळत समाविष्ट करण्यात आली.
  7. इंदिरा गांधी यांचा दरारा प्रचंड होता. अनेकजणांना इंदिरा गांधींची आदरार्थी भीती होती. ‘द ओन्ली मेन इन हर कॅबिनेट’ असेही इंदिरा गांधी यांना संबोधले जाई.
  8. इंग्लंडच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि इंदिरा गांधी या चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही आपापल्या देशात ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जात.
  9. इंदिरा गांधी या पॅलेस्टाईनच्या कट्टर समर्थक होत्या. अमेरिकेच्या मिडल ईस्ट पॉलिसी फॉर्म्युलेशनमध्ये इंदिरा गांधींनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता.