AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता राहुल बोसने हॉटेलमध्ये दोन केळी मागवल्या, बिल पाहून धक्काच बसला!

बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगनिमित्त पंजाबमधील चंदीगडमध्ये आहे. शूटिंग सुरु असल्याने राहुल बोस (Rahul Bose) चंदीगडमधील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबला आहे.

अभिनेता राहुल बोसने हॉटेलमध्ये दोन केळी मागवल्या, बिल पाहून धक्काच बसला!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 24, 2019 | 12:43 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगनिमित्त पंजाबमधील चंदीगडमध्ये आहे. शूटिंग सुरु असल्याने राहुल बोस (Rahul Bose) चंदीगडमधील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबला आहे. मात्र या हॉटेलमधील बिल पाहून राहुलला धक्का बसला आहे.

राहुल बोसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार राहुलने हॉटेलमध्ये दोन केळींची ऑर्डर दिली. मात्र या केळींचं बिल पाहून त्याला धक्काच बसला. हॉटेलने दोन केळींपोटी तब्बल 442 रुपयांचं बिल राहुलच्या रुममध्ये पाठवलं.

राहुलने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “शूटिंगमुळे मी या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलो आहे. व्यायामानंतर मी खाण्यासाठी दोन केळी मागवल्या. ऑर्डरनुसार केळींसोबत बिलही आलं. जीएसटीसह हे बिल आहे 442 रुपये” असं राहुल म्हणाला.

दोन केळींचं बिल तब्बल 442 रुपये पाहून राहुलने खूपच नाराजी व्यक्त केली.  राहुलने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली अनेक कमेंट येत आहेत. कोणी म्हणतो यातील जीएसटीच्या रकमेत अनेक डझन केळी आली असती, तर कोणी म्हणतं जर तू मँगो शेक वगैरे मागवला असतास तर त्याची किंमत आयफोन इतकी असती.

Follow Us