AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare: ‘त्यांचं नाव घेऊन…’, रामदास कदम यांना एका ओळीतच सुनील तटकरे यांचा सणसणीत टोला, म्हणाले काय?

Sunil Tatkare on Ramdas Kadam: अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी शिवसेने नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाक्यात सोक्षमोक्ष लावला. त्यांनी पलटवार करण्याचे मोठे संकेत दिले. आज बारामतीत आल्यावर काय म्हणाले तटकरे?

Sunil Tatkare: 'त्यांचं नाव घेऊन...', रामदास कदम यांना एका ओळीतच सुनील तटकरे यांचा सणसणीत टोला, म्हणाले काय?
रामदास कदम यांना एका ओळीतच सुनील तटकरे यांचा सणसणीत टोला
| Updated on: Nov 10, 2026 | 11:16 AM
Share

Sunil Tatkare on Ramdas Kadam: माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात यावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांनी तर मध्यंतरी यावरून मोठे वादळ उठवले होते. तर सोमवारी ऐन दिवाळीतच शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात आरोपांची लडच लावली. त्यांनी अपघातावरून तटकरे यांच्यावर संशयाचा बॉम्ब फोडला आणि विमान अपघातामागे तटकरेंचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि  थेट चौकशीची मागणी केली. आज तटकरे हे अजितदादांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी बारामती येथे आले. तेव्हा त्यांनी रामदासभाईंना सणसणीत टोला लगावला, काय म्हणाले तटकरे?

दादांशिवाय बारामतीत येण्याचा दुर्दैवी, अभागी क्षण आम्हा सर्वांवरती आला. त्याच्या प्रचंड वेदना, दुःख मनात साठवलेले आहे. गेल्या तीन दशकं आवर्जून पाडव्याला बारामतीला आलो. बारामतीचा उसळलेला महासागर अनुभवला आहे. दादांची भेट होत होती. शरद पवार यांनाही भेटण्याचा योग आला. आज दादांशिवाय पाडवा हे कधी मनाला पटूच शकत नाही. नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. पाडव्याच्या शुभेच्छा त्यांच्याकडून घ्याव्यात या कृतज्ञतेच्या भूमिकेतून इथं आलो आहे. या पवित्र स्मृतीस्थळी आलो आहे, त्यामुळे कुठलंही राजकीय भाष्य मी करणार नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.

रामदास कदम यांना सणसणीत टोला

शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर तटकरे व्यक्त झाले. कदम यांच्यावर कालच मी बोलो आहे. त्यांचं नाव घेऊन या पवित्र जागेच माहात्म्य मला कमी करायचे नाही. ही पवित्र जागा अशी आहे, जिथे पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी करोडो वारकरी संप्रदाय जात असतो. माझ्यासारखे असे करोडो वारकरी आहेत. जे बारामतीला पंढरी मानतात. शरद पवार यांच्यापासून दादा आमचे सर्वस्व आहेत. आज या ठिकाणी आलो असल्याने कुणाचे तरी नाव घेऊन, त्यावर प्रतिक्रिया देऊन या पवित्र जागेचे महात्म्य मला कमी करायचे नाही. ते अबाधित ठेवायचे आहे, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.

रामदास कदम यांचा आरोप काय?

शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी याप्रकरणी तटकरे यांची सखोल तपासणी करण्याची मागणीही केली होती. तटकरे यांनी कालच हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी कदम यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले. दरम्यान शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा कदम यांची बाजू उचलत तटकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली.

Follow Us
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग