AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jensen Huang : अनैतिक संबंधांमुळे Nvidia CEO चा घटस्फोट झाला, तर तो जगातला सर्वात महागडा घटस्फोट असेल, 7.8 लाख कोटी इतका प्रचंड पैसा पत्नीला मिळेल

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले Nvidia चे CEO जेनसन हुआंग सध्या त्यांच्या संपत्तीमुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पत्नीशी बेवफाई केल्याची कबूली त्यांनी दिल्यांनंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. जर डिवोर्स झाला तर हा जगातील सर्वात महागडा डिवोर्स ठरण्याची शक्यता आहे.

Jensen Huang : अनैतिक संबंधांमुळे Nvidia CEO चा घटस्फोट झाला, तर तो जगातला सर्वात महागडा घटस्फोट असेल,  7.8 लाख कोटी इतका प्रचंड पैसा पत्नीला मिळेल
Jensen Huang Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 11:03 AM
Share

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले Nvidia चे CEO जेनसन हुआंग सध्या त्यांच्या संपत्तीमुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पत्नीशी बेवफाई केल्याची कबूली त्यांनी दिल्यांनंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. पण या चर्चांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते संपत्तीवाटप. जर जेनसन हुआंग आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला तर आपल्या संपत्तीतील मोठा हिस्सा पत्नीला द्यावा लागू शकतो. काही अंदाजानुसार ही रक्कम तब्बल 81.1 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 7.8 लाख कोटी रूपये असू शकतो. असा अंदाज व्यक्त केला जात आहे

जेनसन हुआंग यांची 162 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

फोर्बसच्या आकडेवारीनुसार 8 नोव्हेंबर 2026 रोजी जेनसन हुआंग यांची एकूण संपत्ती सुमारे 162.2 अब्ज डॉलर होती. या संपत्तीचं समान वाटप झालं तर, 81.1 अब्ज डॉलर संपत्ती पत्नी लोरी यांच्या वाट्याला येऊ शकतात. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास 7.8 लाख कोटी रूपये होते. त्यामुळे हा घटस्फोट प्रत्यक्षात झाल्यास जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरू शकतो. असा अंदाज वर्तवला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणात कॅलिफोर्नियातील संपत्तीवाटपाचा कायदा महत्त्वाचा ठरू शकतो. तिथे कम्यूनिटी प्रॉपर्टी ही व्यवस्था लागू आहे. या नियमानुसार लग्नानंतर मिळवलेली संपत्ती सामान्यत: पती पत्नीची संयुक्त मानली जाते आणि घटस्फोटाच्या वेळी तिचं समान वाटप होऊ शकतं. मात्र याचा अर्थ एखाद्या व्यक्तीची संपूर्ण संपत्ती आपोआप अर्धी होते. असा नाही.लग्नाआधीची संपत्ती, वैयक्तिक मालमत्तेचे दावे, कर्ज,ट्रस्ट आणि आधी केलेले कायदेशीर करार यांचाही विचार केला जातो.

बेवफाईची कबूली दिल्यानंतर चर्चांना सुरूवात

जेनसन हुआंग यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सिंगापूरमधील मेगास्पीड कंपनीशी संबंधित एलिस हुआंग यांच्याशी कथित संबंधांच्या माहितीनंतर सुरू झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इमेलमध्ये त्यांनी पत्नीशी बेवफाई केल्याचं मान्य केलं आणि आपल्या या कृतीमुळे पत्नी आणि मुलांना दुखावल्याबद्दल माफी मागितली. पण त्यांनी त्या मेलमध्ये एलिस हुआंग हिचं नाव घेतलं नाही अशी माहिती मिळाली आहे.

या प्रकरणामुळे Nvidia च्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. जेनसन हुआंग हे परदेशी गुप्तचर यंत्रणेच्या कारवाईचं लक्ष्य होते का? याची तपासणी केली जात आहे. कंपनीने सध्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला किंवा Nvidia च्या गोपनीय माहितीला धोका निर्माण झाल्याचं मान्यण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे.

जेफ बेजोस यांच्या घटस्फोटाशी तुलना

या संभाव्य संपत्तीवाटपाची तुलना Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या घटस्फोटाशी केली जात आहे. 2019 मध्ये जेफ बेजोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी मॅकेन्झी स्कॉट यांना सुमारे 35.6 अब्ज डॉलर किमतीचे Amazon समभाग मिळाले होते.

मात्र सध्या जेनसन आणि लोरी हुआंग यांच्या घटस्फोटाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे 81.1 अब्ज डॉलर किंवा 7.8 लाख कोटी रूपयांची रक्कम ही प्रत्यक्ष देण्यात येणारी पोटगी किंवा ठरलेली संपत्तीवाटपाची रक्कम नाही. हे केवळ संभाव्य संपत्तीवाटपावर आधारित गणित आहे.

Follow Us
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना.....
NCP Merger News : दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण तूर्तास लांबणीवर; सुनील तटकरेंना दादांचं पद मिळेल अशी अपेक्षा होती पण...
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून...
Gokul : Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अजित नरकेंचं नाव आघाडीवर; महायुतीकडून हालचालींना वेग
4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार
Gokul : 4 सदस्यांची नियुक्ती रोखण्यास औरंगाबाद खंडपीठाचा नकार