पालकांना भीती वाटत असेल तर पाल्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे; शाळेत पाठवू नये : अदिती तटकरे

| Updated on: Nov 23, 2020 | 9:27 PM

पालकांना आपल्या पाल्यांना कोरोना संसर्ग होण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पाल्यांना शाळेत पाठवू नये, असे वक्तव्य राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.

पालकांना भीती वाटत असेल तर पाल्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे; शाळेत पाठवू नये : अदिती तटकरे
aditi tatkare
Follow us on

रायगड : राज्यात सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु (reopening of schools) झाल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, पालकांना आपल्या पाल्यांना कोरोना संसर्ग होण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पाल्यांना शाळेत पाठवू नये, असे वक्तव्य क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी केले. त्या रोहा येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. (Aditi Tatkare appealed parents to give online education to kids)

यावेळी बोलताना, “पालकांनी भीतीच्या वातावरणात आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये. पालकांच्या मनात भीती असल्यास त्यांनी आपल्या पाल्याला घरीच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे” असे अदिती तटकरे म्हणाल्या. तसेच, कोणत्याही विद्यार्थ्याचा शैक्षणिक वेळ वाया जाऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी पाल्यांना केले.

सोमवारपासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यावेळी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांनंतर उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, बीड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमध्ये शेकडो शिक्षकांना कोरना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक संभ्रमावस्थेत आहेत. तसेच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवणे योग्य होईल का?, असा प्रश्नही पाल्यांच्या मनात येत आहे. त्यामुळे पालकांच्या मनातील भीतीचे वातावरण पाहता, पालकांना भीती वाटत असेल तर त्यांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू नये, असे वक्तव्य अदिती तटकरे यांनी केले.

विद्यार्थ्यांना शाळेत येणे सक्तीचे नाही : प्राजक्त तनपुरे

“सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र एखाद्या ठिकाणी कोरोनाचाजास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सेक्रेटरीशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून ऑनलाईन शिक्षण चालू राहील” असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी ( 22 नोव्हेंबर) स्पष्ट केले होते.

शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची गरज : बच्चू कडू

दरम्यान शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हणत शाळा सुरु करण्याच्या ( school opening) निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी सोमवारी ( 22 नोव्हेंबर) व्यक्त केली होती. ते अमरावीत बोलत होते. (Aditi Tatkare appealed parents to give online education to kids)

संबंधित बातम्या :

शाळा उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण, वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती 

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!