कोरोनाची लस दिल्यानंतर 30 मिनिटे दुसऱ्या रुममध्ये ठेवणार, नागपुरात ड्रायरनची जय्यत तयारी

| Updated on: Jan 01, 2021 | 5:56 PM

नागपूरमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. नागपूर पालिका (Nagpur Municipality) आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

कोरोनाची लस दिल्यानंतर 30 मिनिटे दुसऱ्या रुममध्ये ठेवणार, नागपुरात ड्रायरनची जय्यत तयारी
Follow us on

नागपूर : कोरोनाचा (Corona) जीवघेणा काळ पाहिल्यानंतर आता लसीकरणासाठी प्रत्येक महापालिकेमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोरोना लसीकरणाचा (corona vaccination) ड्राय रन (‘Dry Run’ Of Corona Vaccination) देशभर 2 जानेवारीला होणार असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली. यानुसार आता नागपूरमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. नागपूर पालिका (Nagpur Municipality) आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. (after dry run corona vaccination Patient will be kept in another room for 30 minutes nagpur news)

कोरोनाच्या महत्वाच्या टप्प्यात आपण पोहचलो आहोत. गाईडलाईन्स प्रमाणे 3 टप्प्यात लसीकरण करण्याचं नियोजन आहे. यामध्ये हेल्थ केअर वकर्स पहिल्या टप्प्यात असणार आहेत तर 31हजार 14 लोकनेचे अप्लिकेशन आले असल्याची माहिती राधाकृष्णन बी यांनी दिली आहे. ड्राय रनची तयारी झाली हा मोठा कार्यक्रम आहे. यासाठी तीन लोकेशनवर तयारी करण्यात आली असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं आहे.

‘लस दिल्यानंतर 30 मिनिटे दुसऱ्या रुममध्ये ठेवणार’

राधाकृष्णन बी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राय रनचा कार्यक्रम हा दिलेल्या नियमांनुसारच पार पडणार आहे. लसीकरणानंतर 30 मिनिटं त्या व्यक्तीला दुसऱ्या रूममध्ये ठेवण्यात येईल. त्यांचं निरीक्षण केलं जाईल. यासाठी सगळ्या टीम सज्ज झाल्या आहेत. तर यामध्ये फक्त रजिस्टर्ड व्यक्तीलाचं प्रवेश मिळेल. 25 लोकांचा सॅम्पल म्हणून यात सहभाग असणार आहे. इतकंच नाहीतर ड्राय रनदरम्यान वॉक्सिनेशन केलं जाणार नाही. पण प्रक्रिया पूर्णपणे केली जाणार अशीही माहिती आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

या शहरांमध्ये होणार ड्राय रन

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आली आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे.

लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील. महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदुरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. (after dry run corona vaccination Patient will be kept in another room for 30 minutes nagpur news)

संबंधित बातम्या – 

सावधन, वॅक्सिन रजिस्ट्रेशनच्या नावावर लागू शकतो चुना !

Corona Vaccine Dry Run | नव्या वर्षात सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन, केंद्राचा मोठा निर्णय

covishield vaccine च्या आपत्कालीन वापरास मंजुरी, नव्या वर्षातील सर्वात मोठी Good news

(after dry run corona vaccination Patient will be kept in another room for 30 minutes nagpur news)