अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा, मोदी-शाहांच्या मराठीत शुभेच्छा

| Updated on: Mar 25, 2020 | 10:19 AM

‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन अजित पवारांनी केलं. (Ajit Pawar Gudhipadawa Celebration)

अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा, मोदी-शाहांच्या मराठीत शुभेच्छा
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा केला. पुत्र पार्थ पवार यांच्या सोबतीने अजित पवारांनी गुढीची पूजा केली. (Ajit Pawar Gudhipadawa Celebration)

राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना, यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरु नका, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या देशभर ‘21 दिवस लॉकडाऊन’च्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं! कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू नये! संसर्ग कुटुंबियांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन करत सरकार प्रत्येक संकटात जनतेसोबत असल्याही ग्वाही अजित पवारांनी दिली होती. (Ajit Pawar Gudhipadawa Celebration)

‘महाराष्ट्रातील लोक आज गुढीपाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी विविध धर्मीय जनतेला गुढीपाडव्यासोबतच उगाडी, नवरेह, साजीबू चैराओबा या नववर्ष उत्सवाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनीही मराठी भाषेत ट्वीट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

(Ajit Pawar Gudhipadawa Celebration)