गांधीजींच्या पोस्टरवर गोळीबार प्रकरण, हिंदू महासभेची वेबसाईट हॅक

नवी दिल्ली : हिंदुत्त्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाईट गुरुवारी हॅक करण्यात आली. या संघटनेकडून बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पोस्टरवर गोळी घालण्यात आली होती. यानंतर टीम केरळ सायबर वॉरियर्सने वेबसाईट हॅक करत हिंदू महासभेला शिक्षा दिली. शिवाय हिंदू महासभा मुर्दाबाद असा मेसेजही लिहिला. http://www.abhm.org.in/ या यूआरएलन वेबसाईट ओपन केल्यानंतर जे पेज येतं, त्यावर […]

गांधीजींच्या पोस्टरवर गोळीबार प्रकरण, हिंदू महासभेची वेबसाईट हॅक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली : हिंदुत्त्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाईट गुरुवारी हॅक करण्यात आली. या संघटनेकडून बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पोस्टरवर गोळी घालण्यात आली होती. यानंतर टीम केरळ सायबर वॉरियर्सने वेबसाईट हॅक करत हिंदू महासभेला शिक्षा दिली. शिवाय हिंदू महासभा मुर्दाबाद असा मेसेजही लिहिला.

http://www.abhm.org.in/ या यूआरएलन वेबसाईट ओपन केल्यानंतर जे पेज येतं, त्यावर हॅकिंग टीमने, आरोपींवर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली आहे. याशिवाय हिंदू महासभा मुर्दाबादचा मेसेजही वेबसाईटवर लिहिला आणि याचे स्क्रीनशॉटही आता व्हायरल झाले आहेत. ज्या पुजा पांडेने गोळीबार केला, तिला स्वतःचं वजन कमी करण्याचा सल्ला हॅकर्सने दिलीय. ‘Lose your weight instead of losing your brain b****’ असा मेसेज पुजा पांडेसाठी लिहिला.

बुधवारी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीला महासभेच्या काही सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. संघटनेची राष्ट्रीय सचिव पुडा शकुन पांडेय महात्मा गांधींजींच्या पोस्टरवर गोळी घालत असल्याचं व्हिडीओतून दिसत होतं. पुजा पांडेसोबतचे लोक नथुराम गोडसेचा जयजयकार करत होते.

या प्रकरणी अलिगड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस महासभेच्या कार्यालयात पोहोचले आणि तिथे उपस्थित असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी पुजा पांडे आणि तिच्या सहकाऱ्यांसह आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

केरळच्या हॅकर्सकडून या घटनेचा निषेध करण्यासाठी वेबसाईट हॅक करण्यात आली. गांधींजींनी जागतिक स्तरावर शांततेच्या मार्गावर चालण्यासाठी जगाला प्रेरणा दिली, असा मेसेज हॅकर्सने लिहिला. शिवाय ‘arrest this hippopotamus and her goons under sedition charge as soon as possible’. अशीही मागणी केली.

केरळ हॅकर्सने हिंदू महासभेची वेबसाईट हॅक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिंदू महासभेच्या प्रमुखांनी केरळ पूरस्थितीच्या वेळी एक वक्तव्य केलं होतं त्यानंतरही ही वेबसाईट हॅक झाली होती. हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपानी म्हणाले होते, की केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे, पण जे बीफ खात नाहीत त्यांनाच ही मदत करावी, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर केरळ हॅकर्सने वेबसाईट हॅक करुन निषेध नोंदवला.

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.