स्विफ्ट डिझायर-ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक, आई-वडील आणि मुलाचा मृत्यू

स्विफ्ट डिझायर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

स्विफ्ट डिझायर-ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक, आई-वडील आणि मुलाचा मृत्यू
| Updated on: Feb 08, 2020 | 3:22 PM

अमरावती : स्विफ्ट डिझायर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली (Swift Dzire-Tractor Accident). या अपघातात दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती वरुड मार्गावर हा अपगात झाला (Swift Dzire-Tractor Accident).

अमरावतीपासून काही अंतरावर असलेल्या माऊली जाहागीर या गावाजवळ ट्रॅक्टर आणि स्विफ्ट डिझायर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात आई, वडील आणि मुलगा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत हे काळबांडे परिवारातील असून ते परिसरातील अमरावती येथील सातुर्णा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.