Amazon India : अ‍ॅमेझॉनकडून मोठी घोषणा, भारतात 20 हजार नोकऱ्या उपलब्ध करणार

| Updated on: Jun 29, 2020 | 1:18 PM

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या (Amazon India Job) आहेत.

Amazon India : अ‍ॅमेझॉनकडून मोठी घोषणा, भारतात 20 हजार नोकऱ्या उपलब्ध करणार
अ‍ॅमेझॉन जॉब तुम्हाला नोकरीसोबत कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याची संधी देत आहे. फक्त 4 तास काम करून तुम्ही दरमहा 70 हजारांपर्यंत कमवू शकता.
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या (Amazon India Job) आहेत. याच दरम्यान ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आता भारतात 20 हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या उपलब्ध करणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून काल (28 जून) करण्यात आली आहे. या नोकऱ्या कंपनी ग्राहकांच्या सेवेनुसार देणार आहे. या सर्व नव्या नोकऱ्या देशातील हैद्राबाद, पुणे, नोएडा, कोलकत्ता, जयपूर, चंदीगढ, मंगळूर, इंदोर, भोपाळ, कोइम्बतुर आणि लखनऊ या 11 शहरात दिल्या जाणार (Amazon India Job) आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या सर्वाधिक नोकऱ्या या व्हर्चुअल कस्टमर सर्व्हिस प्रोग्राम यामध्ये असणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार काम करुण्याची सुविधा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना ग्राहकाची गरज समजून घेऊन घर बसल्या त्यांच्यासाठी उपयोगी कस्टमाईज्ड सुविधा पोहचवणे गरजेचे आहे. या सर्व सर्व्हिस ई-मेल, मेसेज, सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल.

“या नोकऱ्यांसाठी कुणीही अर्ज करु शकता. अर्जदार दहावी पास असणे अनिवार्य आहे. त्यासोबत त्याला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, आणि कन्नड भाषां लिहिता, वाचता येणे गरजेचे आहे. कंपनीने स्पष्ट सांगितले आहे की, या नोकऱ्या तात्पुरत्या असणार आहेत. कंपनीच्या गरजेनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर वर्षाच्या शेवटी त्यांना परमनेंट केले जाऊ शकते”, असं अ‍ॅमेझॉन इंडियाने सांगितले.

“भारतात 2025 पर्यंत 10 लाख नोकऱ्या निर्माण करणार. या नवीन नोकऱ्या कंपनीच्या नेटवर्क अँड टेक्नोलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या फील्डमध्ये असणार आहेत. या सर्व नोकऱ्या इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी, स्किल डेव्हलपमेंट, कंटेंट क्रिएशन, रीटेल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असतील, असंही कंपनीने सांगितले.

संबंधित बातम्या :

नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा, मनसेचं तरुणांना आवाहन

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात