मोबाईल रिचार्जपासून किराणा मालापर्यंत… अमेझॉनवर दमदार ऑफर्स

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई : अमेझॉन कंपनी सतत ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स घेऊन येत असते. यंदाही कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अब बडा होगा पैसा’ अशी दमदार ऑफर आणली आहे. ज्यामध्ये चार हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहकांना या ऑफर्सचा फायदा मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट, जेवणाची ऑर्डर, मूव्ही टिकीट, ट्रॅव्हल बुकिंग, औषधे, किराणा सामान आणि खेळणी यांसारख्या अनेक गोष्टींवर ही […]

मोबाईल रिचार्जपासून किराणा मालापर्यंत... अमेझॉनवर दमदार ऑफर्स
Follow us on

मुंबई : अमेझॉन कंपनी सतत ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स घेऊन येत असते. यंदाही कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अब बडा होगा पैसा’ अशी दमदार ऑफर आणली आहे. ज्यामध्ये चार हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहकांना या ऑफर्सचा फायदा मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट, जेवणाची ऑर्डर, मूव्ही टिकीट, ट्रॅव्हल बुकिंग, औषधे, किराणा सामान आणि खेळणी यांसारख्या अनेक गोष्टींवर ही ऑफर्स मिळणार आहे. ही ऑफर्स 31 डिसेंबरपर्यंत अमेझॉनवर उपलब्ध असेल.

मोबाईल रिचार्ज

‘अमेझॉन पे’च्या माध्यमातून रिचार्ज केला तर, तुम्हाला टॉकटाईम आणि डेटा प्लॅन्स मिळतील. अमेझॉन पेवरुन जर ग्राहकाने कोणत्याही पेमेंट मोडमधून रिचार्ज केला तर त्याला 30 टक्के कॅशबॅक मिळणार. पण तोच रिचार्ज जर पुन्हा अमेझॉन पेवरुन केला, तर ग्राहकाला 30 रुपये कॅशबॅक मिळणार. या ऑफर्ससाठी कोणत्याही मिनिमम रिचार्ज व्हॅल्यूची गरज नाही आणि हे सर्व मोबाईल ऑपरेटरच्या रिचार्ज प्लॅनवर अवलंबून आहे.

बिल पेमेंट

अमेझॉन पेच्या माध्यमातून ग्राहक आपल्या डीटीएच पॅकेज आणि ब्रॉडबँड कनेक्शन्सही अपग्रेड करु शकतात. यावर त्यांना काही रीवॉर्डही मिळणार आहेत. अमेझॉन पेच्या माध्यमातून बिल पे केले तर 20 टक्क्यांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. तसेच लाईट बिल, पोस्टपेड, लॅंजलाईन, ब्रॉडबँड आणि गॅस याचे बिल पे केल्यावर 75 रुपयांची कॅशबॅक ऑफर ग्राहकांना मिळणार आहे.

जेवणाची ऑर्डर

तुम्हाला जर खाण्याची आवड असेल तर दमदार अशी ऑफर अमेझॉनने दिली आहे. जर ग्राहकाने अमेझॉन पेच्या टॉप पार्टनर्सच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली, तर त्यांना अप्रतिम कॅशबॅक ऑफर मिळेल. ग्राहक विविध फूड अॅप्स आणि वेबसाईटपेक्षा अमेझॉनवरुनही आता जेवणाची ऑर्डर करु शकता यावर तुम्हाला कॅशबॅक ऑफर्स मिळणार आहे.

स्विगीवर अमेझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट केला तर 75 रुपये कॅशबॅक मिळतील, तर डॉमिनोसमध्ये 100 रुपयांची कॅशबॅक मिळेल. तसेच फ्रेसमेन्यू आणि फासोसवर ही 75-75 रुपयांची कॅशबॅक मिळेल.