पंतप्रधान कार्यालयात प्रवेश करताच मोदींचा पहिला निर्णय पोलिसांसाठी

नवी दिल्ली : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिला निर्णय पोलिसांसाठी घेतलाय. नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींना दरमहिन्याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती फक्त सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनाच मिळत होती. पण शहीद पोलिसांच्या मुलांनाही याचा फायदा होणार आहे. मोदींनी प्रचारादरम्यान मुंबईतल्या सभेत […]

पंतप्रधान कार्यालयात प्रवेश करताच मोदींचा पहिला निर्णय पोलिसांसाठी
Follow us
| Updated on: May 31, 2019 | 6:15 PM

नवी दिल्ली : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिला निर्णय पोलिसांसाठी घेतलाय. नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींना दरमहिन्याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती फक्त सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनाच मिळत होती. पण शहीद पोलिसांच्या मुलांनाही याचा फायदा होणार आहे.

मोदींनी प्रचारादरम्यान मुंबईतल्या सभेत पोलिसांविषयी सहानुभूतीपूर्वक अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आतापर्यंत हजारो पोलिसांनी संरक्षण करताना स्वतःचं बलिदान दिलंय, पण त्यांच्या कुटुंबीयांकडे कुणीही पाहिलं नाही, असं ते म्हणाले होते. पहिल्याच कॅबिनेटमध्ये पोलिसांच्या मुलांसाठी हा निर्णय घेत शहिदांच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिलाय.

काय आहे पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना?

राष्ट्रीय संरक्षण निधीतून माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना दरमहिन्याला उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. मुलांसाठी ही रक्कम 2000 रुपयांवरुन 2500, तर मुलींसाठी 2250 रुपयांवरुन 3000 प्रति महिना एवढी करण्यात आली आहे. दरवर्षी शहीद पोलिसांच्या 500 मुलांना योजनेचा लाभ होईल. प्रत्येक वर्षासाठी 500 एवढी मर्यादा ठेवण्यात आली आहे.

आतार्यंत या योजनेचा लाभ फक्त निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांसाठीच मर्यादित होता. पण कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ होईल. वाढ केलेली रक्कमही योजनेसाठी पात्र मुलांना मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीने आतापर्यंत लाखो मुलांना मदत केली आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.