Lockdown | ‘सगळ्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो, पण स्वप्नांना नाही’, KBC पुन्हा सुरु होणार

| Updated on: May 03, 2020 | 3:26 PM

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'सोनी टीव्ही' वाहिनीवर प्रेक्षकांसमोर एक कविता सादर केली आहे (Kaun banega crorepati comeback).

Lockdown | सगळ्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो, पण स्वप्नांना नाही, KBC पुन्हा सुरु होणार
Follow us on

मुंबई : जगभरात थैमान घालणारा कोरोना भारतातही फोफावत चालला आहे (Kaun banega crorepati comeback). कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. अशा परिस्थतीत देशातील अत्यावश्यक सेवा वगळता रेल्वे वाहतूक, दुकानं बंद आहेत. याशिवाय देशातील चित्रपट आणि मालिकांचं चित्रिकरणदेखील बंद आहे. याच गोष्टीचा धागा पकडत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवर प्रेक्षकांसमोर एक कविता सादर केली आहे. ही कविता ‘कौन बनेगा करोडपती?’ या कार्यक्रमावर आधारित आहे. या कवितेत “जगभरात सगळ्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो. मात्र, स्वप्नांना ब्रेक लागू शकत नाही”, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे (Kaun banega crorepati comeback).

अमिताभ बच्चन यांचा ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती?’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु होणार आहे. याच कार्यक्रमाच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन एक कविता सादर करताना दिसत आहेत. या कवितेत ते ‘केबीसी’मार्फत आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ‘केबीसी’च्या नव्या सीझनसाठी 9 मे तारखेच्या रात्री 9 वाजेपासून रजिस्ट्रेशन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी सादर केलेली कविता (मराठीत अनुवादीत)

प्रत्येक गोष्टीला ब्रेक लागू शकतो,
रस्त्यावरच्या चहाच्या दुकानांना ब्रेक लागू शकतो,
या दुकांनांवर चहा पिणाऱ्यांच्या गप्पांना ब्रेक लागू शकतो,
बाईकवरच्या ट्रिपलसीट प्रवासाला ब्रेक लागू शकतो,
अर्ध्या रात्रीच्या फेरफटका मारण्याला,
शॉपिंग मॉलवरच्या प्रेमाला, रस्त्यावरच्या मित्राला,
सगळ्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो,

सकाळच्या शाळेला, रस्त्यावरच्या धुळीला,
आयुष्याच्या रेसला, कॉन्फरन्स रुमच्या मेसला,
घड्याळ्याच्या टिकटिकला, शांताबाईच्या किटकिटला,
ट्रेनच्या हाहा:कारला, हृदयाच्या ठोक्यांना,
सगळ्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो,

मात्र, एक गोष्ट आहे ज्याला ब्रेक लागू शकत नाही, स्वप्नांना!
स्वप्नांच्या पंखांना भरारी घेण्यासाठी पुन्हा आलोय!

अमिताभ बच्चन आणि ‘कौन बनेगा करोडपती?’

अमिताभ बच्चना यांचा ‘कौन बनेगा करोडपती?’ हा कार्यक्रम 2000 साली सुरु झाला. या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अमिताभ बच्चन दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर दिसतात. या कार्यक्रमात अनेक स्पर्धक सहभागी होतात आणि आपलं नशिब आजमवतात. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 11 सीझन झाले आहेत. या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक वेगळं नातं तयार झालं आहे.

संबंधित बातमी :

Maharashtra Corona Live | दिल्लीत CRPF चे मुख्यालय सील, एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण