पावसामुळे सोयाबीन गेलं, आता कपाशीला बोंडअळी आली, आर्थिक अडचणीतून शेतकऱ्याची आत्महत्या

| Updated on: Nov 07, 2020 | 11:53 AM

दिवाळी कशी साजरी करायची या आर्थिक विवंचनेतून या शेतकऱ्याने गळफास घेतला. (Amravati Farmer Commit suicide due to financial loss) 

पावसामुळे सोयाबीन गेलं, आता कपाशीला बोंडअळी आली, आर्थिक अडचणीतून शेतकऱ्याची आत्महत्या
Follow us on

अमरावती : अमरावतीतील तिवसा तालुक्यातील एका 54 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपाशीला आलेली बोंड अळी पाहून नुकसान झाल्याने दिवाळी कशी साजरी करायची या आर्थिक विवंचनेतून या शेतकऱ्याने गळफास घेतला. देवराव सांभारे (54) असे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. (Amravati Farmer Commit suicide due to financial loss)

मिळालेल्या माहितीनुसार, देवराव सांभारे यांच्याकडे  चार एकर शेती आहे. त्यातील दोन एकर शेतीत त्यांनी सोयाबीनची तर उर्वरित शेतात त्यांनी कपाशीची लागवड केली होती. त्यातील सोयाबीनच्या शेताच्या परतीच्या पावसामुळे आणि खोडकिड्यामुळे नुकसान झाले.

त्यामुळे त्या शेतकऱ्याची सर्व भिस्त ही कपाशीवर होती. मात्र कपाशीवरही बोंड अळीने घात केला. त्यामुळे कपाशी पूर्णपणे सडली. या शेतकऱ्याने स्वत: शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पण कपाशीवरील बोंड अळीमुळे सर्व कपाशी ही मातीमोल झाली होती.

शेतात लागवड केलेल्या दोन्ही पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून त्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतकऱ्याने नुकसान पाहून थेट घरी येऊन गळफास लावत आत्महत्या केली.

दिवाळी तोंडावर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेजची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे काही शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  (Amravati Farmer Commit suicide due to financial loss)

संबंधित बातम्या : 

मराठवाड्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच; पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्या; अन्यथा महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु