CCTV | मास्क घालण्याचा सल्ला दिल्याचा राग, कर्मचाऱ्याची महिला सहकाऱ्याला रॉडने मारहाण

| Updated on: Jun 30, 2020 | 3:25 PM

मास्क घालण्याचा सल्ला ऐकून आरोपीचा संताप झाला. त्याने महिलेला केस धरुन खेचले. त्यानंतर अक्षरशः हाताला येईल त्या वस्तूने तो बेदम मारहाण करत सुटला. (Andhra Pradesh Tourism Department Employee beats Lady Colleague for asking to wear mask)

CCTV | मास्क घालण्याचा सल्ला दिल्याचा राग, कर्मचाऱ्याची महिला सहकाऱ्याला रॉडने मारहाण
Follow us on

हैदराबाद : ‘कोरोना’पासून बचावासाठी मास्क घालण्याचा सल्ला देणाऱ्या महिला अधिकाऱ्याला कार्यालयातील सहकाऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेश पर्यटन विभागाच्या हॉटेलमध्ये घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Andhra Pradesh Tourism Department Employee beats Lady Colleague for asking to wear mask)

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घाला, असा सल्ला आंध्र प्रदेश पर्यटन विभागाच्या हॉटेलमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याने उपव्यवस्थापक पदावर कार्यरत आरोपीला दिला.

महिलेचा सल्ला ऐकून आरोपीचा संताप झाला. त्यांनी महिलेला केस धरुन खेचले. त्यानंतर अक्षरशः हाताला येईल त्या वस्तूने ते बेदम मारहाण करत सुटले. अखेर हाताशी लागलेल्या लोखंडी रॉडनेही त्यांनी महिलेला मारहाण केली.

मारहाण करताना कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर सहकाऱ्यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही कर्मचार्‍यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाहीत. सर्वांना ढकलून त्यांनी मारहाण सुरुच ठेवली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हेही वाचा : गावकऱ्यांची अंधश्रद्धा, गर्भवती सुनेचे पार्थिव झाडाला बांधण्याची कुटुंबाला जबरदस्ती

दरम्यान, महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कलम 324 , 355 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास करताना आज सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा धक्कादायक व्हिडिओ दिसला. राज्य शासनानेही आरोपी अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.