‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यांनंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही हे दावे खोडले आहेत (Ankita Lokhande on Rhea Chakraborty claims).

'आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता', अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 11:17 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यांनंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही हे दावे खोडले आहेत (Ankita Lokhande on Rhea Chakraborty claims). सुशांत 2016 पर्यंत कुठल्याही नैराश्यात नव्हता. आम्ही जोपर्यंत एकत्रित होतो तोपर्यंत तो व्यवस्थित होता, असा दावा अंकिता लोखंडेने केला. रियाने सुशांत 2013 पासून नैराश्यात असल्याचा दावा केला होता. अंकिताने ट्विटरवर एक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अंकिता लोखंडेने म्हटलं आहे, “मी आणि सुशांत 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत एकत्र होतो. या काळात त्याला कधीही नैराश्येचा त्रास झाला नाही. तसेच त्याने कोणत्याही मानसोपचार तज्ज्ञाचे उपचारही घेतले नाही. तो अगदी व्यवस्थित होता.”

“मी कधीही कोठेही असं म्हटलं नाही की मी आणि सुशांत आम्ही वेगळे झाल्यानंतरही संपर्कात होतो. खरंतर मी असं म्हटले होते की मणिकर्णिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सुशांतने इन्स्टाग्रावर माझ्या एका पोस्टरवर कमेंट केली होती. त्याने मला माझ्या या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला प्रतिसाद म्हणून मी त्यावर कमेंट केली होती. त्यामुळे रियाने म्हटल्याप्रमाणे आम्ही फोनवर बोललो हा दावा मी खोडते.”

“मी माझ्या मुलाखतींमध्ये असंच म्हटले आहे की मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता. आम्ही दोघांनी त्याच्या यशासाठी एकत्र स्वप्न पाहिली. त्याच्या यशासाठी मी प्रार्थना केली आणि तो यशस्वी झाला. मी हेच म्हटलं आहे,” असं अंकिता लोखंडे म्हणाली.

“जर मला रिया आणि तिच्या सुशांतसोबतच्या नात्याविषयी विचारलं तर मी अगदी प्रामाणिकपणे हेच सांगितलं आहे की मी तिला ओळखत नाही आणि त्यांच्या नात्याविषयी माझी काही हरकत नाही. माझी हरकत तेव्हा आहे जेव्हा एक व्यक्ती त्याचा जीव गमावतो. मला जर आम्ही सोबत असतानाच्या वेळी काय घडलं याविषयी प्रश्न विचारण्यात आले तर मी अगदी प्रामाणिकपणे उत्तरं देईल आणि जे सत्य आहे ते सांगेल,” असंही अंकिता लोखंडेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

“सुशांतच्या घरच्याकडे रियाविरोधात पुरावे, मी ते पाहिलेय”

अंकिता लोखंडे म्हणाली, “माझ्या फ्लॅटविषयी मी आधीच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सुशांतच्या कुटुंबाला देखील माझ्याविषयी काही आक्षेप नाही. मी पुरावे आणि सत्याच्या बाजूने आहे आणि म्हणूनच सुशांतच्या घरच्यांसोबत आहे, रियासोबत नाही. सुशांतच्या कुटुंबीयांच्या मते रिया त्या व्यक्तींपैकी आहे ज्यामुळे सुशांत आज नाही. त्यांच्याकडे तसे चॅट आणि इतर पुरावे आहेत ते नाकारता येणार नाहीत. मी देखील ते पाहिले आहे. त्यामुळे मी सुशांतच्या कुटुंबाची बाजू ऐकून त्यांच्या बाजूने आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्या बाजूने राहिल.”

संबंधित बातम्या :

Sushant Singh | हो, शवगृहात गेल्यावर पार्थिवाला सॉरी बोलले, पहिल्या मुलाखतीत रियाची रोखठोक भूमिका

Sushant Death Case Live | रियाच्या वडिलांना ईडीचे समन्स, इंद्रजीत चक्रवर्ती ईडी कार्यालयाकडे रवाना

सुशांत-रियाचे 8 जूनला कडाक्याचे भांडण, रियाने 8 हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या : सिद्धार्थ पिठाणी

Ankita Lokhande on Rhea Chakraborty claims

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.