बिगबॉस फेम सुरेखा कुडचीसह विविध कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन

| Updated on: Nov 21, 2021 | 1:30 PM

मुंबईत आज सुरेखा कुडूची, पुष्पा चौधरी, शशिकांत डोईफोडे, अस्मिता देशमुख, डिंपल चोपडे आदी कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यापूर्वी आनंद शिंदे आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बिगबॉस फेम सुरेखा कुडचीसह विविध कलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन
अनेक मराठी कलाकारांचा आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार
Follow us on

मुंबईः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. याच मालिकेत आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होईल. मुंबईत आज यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुरेखा कुडूची, पुष्पा चौधरी, शशिकांत डोईफोडे, अस्मिता देशमुख, डिंपल चोपडे आदी कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यापूर्वी आनंद शिंदे आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बिगबॉस फेम सुरेखा कुडची यांचा जाहीर प्रवेश

बिग बॉस मालिकेत प्रसिद्धी मिळणाऱ्या तसेच अनेक ट्विट्सवरून चर्चेत असलेल्या सुरेखा कुडची या आधीपासूनच राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्षपदावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एका जाहीर कार्यक्रमात त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. आज पुन्हा एकदा त्यांचे पक्षात भव्य स्वरुपात स्वागत होईल.

देवमाणूस मालिकेतील प्रसिद्ध व्यक्तींचा राजकारणात प्रवेश

देवमाणूस या मालिकेतील प्रसिद्ध पात्र वंदी आत्या म्हणजेच पुष्पा चौधरी तसेच चित्रपट निर्माता दिग्दर्शक शशिकांत डोईफोडे, अभिनेत्री अस्मिता देशमुख, डिंपल चोपडे अंकूश मांडेकर , दिग्दर्शक गणेश शिंदे ही सर्व छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मंडळी आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. छोट्या पडद्यावर तुफान यश व लोकप्रियता मिळवल्यानंतर राजकारणातील रंगमंचावर ते आपले नेतृत्व आजमावतील. यासाठी आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार आणि स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

आमचं सरकार होत तेव्हाही विलिनीकरण कुठे झालं..? रोडवर एक आणि आत गेल्यावर वेगळं असतं, जनतेनं हुशार व्हावं : महादेव जानकर

Nashik: विद्या असूनही मती गेली, डॉक्टर नववधूच्या Virginity Testचा प्रयत्न, वर मर्चंट नेव्हीमध्ये!