AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचं सरकार होत तेव्हाही विलिनीकरण कुठे झालं..? रोडवर एक आणि आत गेल्यावर वेगळं असतं, जनतेनं हुशार व्हावं : महादेव जानकर

रोडवर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावरील एक पर्याय असल्याचं महादेव जानकर म्हणाले.

आमचं सरकार होत तेव्हाही विलिनीकरण कुठे झालं..? रोडवर एक आणि आत गेल्यावर वेगळं असतं, जनतेनं हुशार व्हावं : महादेव जानकर
महादेव जानकर
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 11:23 AM
Share

बुलडाणा : एसटीचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर यांचे एकेकाळचे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं आहे. आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झालं..? , रोडवर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं. म्हणून जनतेनं हुशार झालं पाहिजे हा त्यावरील एक पर्याय असल्याचं महादेव जानकर म्हणाले. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर आले होते.

महादेव जानकर काय म्हणाले?

“आमचे सरकार असताना कुठं झाले विलिनीकरण, रस्त्यावर असताना एक बोलावं लागत आणि आत गेल्यावर एक असतं, त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळं जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे”, असं वक्तव्य जानकारांनी केलं आहे.

महादेव जानकर यांचा भाजपला घरचा आहेर

आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा झालं नाही, जनतेनं हुशार होणं हाच मार्ग असल्याचं महादेव जानकर म्हणाले. त्यामुळं महादेव जानकर यांनी भाजपला एक प्रकारे घरचा आहेर दिला असल्याचं बोललं जातंय.

रविकांत तुपकर यांची विचारपूस

बुलडाण्यात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महादेव जानकर आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं. तर तुपकर हे चळवळीतील कार्यकर्ते सून कुठलीही माय बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही म्हणत तुपकर यांनी आंदोलन केले म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे, म्हणून मी आलो असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

इतर बातम्या:

माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पीएम केअर फंडातून भरपाई द्या; संजय राऊतांची मागणी

एसटीच्या संपाला ब्रेक लागेना! आणखी 380 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

Mahadev Jankar comment on ST strike and Merger and people should understand politics behind all system

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.