अरुण जेटली बजेटपूर्वी उपचारासाठी अमेरिकेला रवाना

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली: देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी किडनी संदर्भातील आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण जेटली हे रविवारी रात्री अमेरिकेला रवाना झाले. गेल्या वर्षी 14 मे 2018 रोजी जेटली यांची किडनी प्रत्यारोपण झाली होती. गेल्या 9 महिन्यांपासून त्यांनी एकही परदेश दौरा केला नव्हता. गेल्या वर्षी अरुण जेटली यांना दिल्लीतील […]

अरुण जेटली बजेटपूर्वी उपचारासाठी अमेरिकेला रवाना
Follow us on

नवी दिल्ली: देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी किडनी संदर्भातील आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण जेटली हे रविवारी रात्री अमेरिकेला रवाना झाले. गेल्या वर्षी 14 मे 2018 रोजी जेटली यांची किडनी प्रत्यारोपण झाली होती. गेल्या 9 महिन्यांपासून त्यांनी एकही परदेश दौरा केला नव्हता.

गेल्या वर्षी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांचं डायलसिस करण्यात आलं होतं. जेटलींच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यावेळी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर जेटली पुन्हा 23 ऑगस्ट 2018 पासून अर्थमंत्रालयाचा कार्यभार पाहू लागले.

तेव्हापासून अर्थमंत्री जेटली हे सरकारची बाजू जोरदारपणे लावून धरताना पाहायला मिळतात. संसदेच्या दोन्ही सभागृहात असो, पत्रकार परिषदा असो किंवा अन्य कोणतंही व्यासपीठ असो, अरुण जेटली विरोधकांना तोडीस तोड उत्तर देतात.

दरम्यान, अरुण जेटली हे 1 फेब्रुवारी रोजी आपला सहावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे अंतरिम बजेट असेल, मात्र त्यांचं बजेट भाषण हे सर्वसाधारण बजेट सारखंच असेल, अशी आशा आहे.

आता पाच लाखांपर्यंत शून्य टॅक्स? 

सवर्ण वर्गातील आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आता मोदी सरकार आणखी एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत आहे. येत्या 1 फेब्रुवारीला मांडण्यात येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या तयारी मोदी सरकार आहे. म्हणजेच, पाच लाख रुपयांपर्यंत करदात्यांना कर भरावा लागणार नाही. आगामी अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या 

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता  

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार षटकाराच्या तयारीत  

आता पाच लाखांपर्यंत शून्य टॅक्स?