तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचे भाग्यनगर होणार नाही, ओवेसींचा आदित्यनाथांना इशारा

| Updated on: Nov 29, 2020 | 11:03 AM

अलाहाबाद प्रयागराज होऊ शकते, तर हैदराबादही पुन्हा भाग्यनगर होऊ शकेल, असं योगी प्रचारसभेत म्हणाले

तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचे भाग्यनगर होणार नाही, ओवेसींचा आदित्यनाथांना इशारा
Oweisi challanges UP cm Adityanath
Follow us on

हैदराबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यात हायव्होल्टेज शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. हैदराबादचे ‘भाग्यनगर’ (Bhagyanagar) असं नामांतर करण्याबाबत वक्तव्य योगींनी केल्यानंतर तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचे नाव हैदराबादच राहील, असा इशारा ओवेसींनी दिला. (Asaduddin Owaisi backfires at Yogi Adityanth ‘Hyderabad renaming as Bhagyanagar remark)

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation (GHMC) योगी आदित्यनाथ प्रचारात उतरले आहेत. राज्यात भाजप सत्तेत येईल, तेव्हा शहराचे नामांतर भाग्यनगर असे करण्याचा इरादा योगींनी बोलून दाखवला.

“उत्तर प्रदेशात भाजप सत्तेत नव्हती, तेव्हा जनता राम जन्मभूमी असलेल्या जिल्ह्याला फैजाबाद म्हणत होते. आम्ही येऊन अयोध्या हे नाव दिले. जर फैजाबाद अयोध्या होऊ शकते, अलाहाबाद प्रयागराज होऊ शकते, तर हैदराबादही पुन्हा भाग्यनगर होऊ शकेल” असं योगी शनिवारी प्रचारसभेत म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांच्या विधानाने एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी चांगलेच खवळले. “तुमची संपूर्ण पिढी संपेल, पण हैदराबादचे नाव हैदराबाद म्हणूनच राहील, या निवडणुका हैदराबाद आणि भाग्यनगर यांच्यात आहेत. जर तुम्हाला हैदराबादचे नाव बदलू नये, असे वाटत असेल, तर मजलीस (एआयएमआयएम) ला मतदान करा” असे आवाहन ओवेसींनी केले.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार या नेत्यांची फौजही मैदानात उतरली आहे. तर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील हैदराबादेत तळ ठोकून आहेत.

योगी सरकारने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील मुघल सरायचे पंडित दीन दयाल उपाध्याय नगर, अलाहाबादचे प्रयागराज, तर फैजाबादचे अयोध्या असे नामांतर केले आहे.

संबंधित बातम्या :

‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे’, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना

‘मोदींनाही प्रचाराला आणा, हैदराबादमध्ये तुमच्या किती जागा येतात पाहू’, ओवेसींचं भाजपला आव्हान

(Asaduddin Owaisi backfires at Yogi Adityanth ‘Hyderabad renaming as Bhagyanagar remark)