वादळातील नुकसानग्रस्तांच्या घरांवर तात्काळ छप्पर, वीज येईपर्यंत केरोसीन आणि जेवणाच्या किट, अस्लम शेख यांचे आदेश

| Updated on: Jun 06, 2020 | 8:48 PM

राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी 'निसर्ग' चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्याचा दौरा केला (Aslam Shaikh on Pune tour amid Nisarga Cyclone).

वादळातील नुकसानग्रस्तांच्या घरांवर तात्काळ छप्पर, वीज येईपर्यंत केरोसीन आणि जेवणाच्या किट, अस्लम शेख यांचे आदेश
Follow us on

पुणे : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्याचा दौरा केला (Aslam Shaikh on Pune tour amid Nisarga Cyclone). यात त्यांनी मुळशी तालुक्यातील भांबार्डे गावचा दौरा करुन परिस्थिचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वादळाचा फटका बसलेल्या कुटुंबांसाठी तात्काळ छप्पर दुरुस्ती, वीज येईपर्यंत केरोसीन आणि जेवणाच्या किट देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुळशी तालुका कोकण भागाच्या अत्यंत जवळ आहे. ताम्हिणी घाट ओलांडल्यावर कोकण हद्द सुरु होते. त्यामुळे साहजिकच या भागात घाटमाथ्यावर वादळाचा परिणाम होऊन मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानेही वर्तवली होती. चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घरं पडली, झाडं उन्मळून पडली आणि विजेच्या पोलचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम पट्टा सध्या अंधारात आहे. अनेक शेतकऱ्यांची खाचरे पाण्याने तुडूंब भरली आहेत. त्यामुळे बळीराजावर भाताच्या दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे.


या परिस्थितीविषयी आणि उपाययोजनांबाबत बोलताना अस्लम शेख म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारचा एक जबाबदार मंत्री या नात्याने मी भांबार्डे गावात आलो आहे. चक्रीवादळामुळे लोकांच्या घरांवरील पत्रे आणि छप्पर उडून गेले आहेत. त्यामुळे मी प्रशासनाला लवकरात-लवकर घरांवर पत्रे व छप्पर बसवण्याचे आदेश दिले आहेत. विजपुरवठा पुर्ववत होईपर्यंत केरोसिनचा पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनास करण्यात आल्या आहेत. तसेच लोकांना जेवणाच्या किटचा देखील पुरवठा करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे विजेच्या खांबांचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजपुरवठा पुर्ववत होण्यासाठी येथील प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.”


यावेळी मुळशी तालुक्याचे तहसिलदार अभय चव्हाण, विभागीय उपायुक्त मत्स्यव्यवसाय देशपांडे, भांबर्डे गावचे सरपंच, गटविकास गधिकारी, मंडळ अधिकारी , तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनाही मंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

कपड्यांसाठी 1800, भांड्यांसाठी 2 हजार, घरांसाठी 95 हजार, वादळग्रस्तांसाठी उद्यापासून थेट मदत!

महापूर विरुद्ध चक्रीवादळ, फडणवीसांकडून मदतीची आठवण, NDRF स्टँडिग ऑर्डरचा दाखला

वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद? मग फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप करा, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून नंबर शेअर

Aslam Shaikh on Pune tour amid Nisarga Cyclone