Atul Bhatkhalkar | कायद्यात सुधारणा करून फीमध्ये 50 % सवलत द्यावी : अतुल भातखळकर

| Updated on: Jul 09, 2021 | 6:46 PM

शालेय शिक्षणमंत्र्यांनी कायद्यात सुधारणा करून फी मध्ये 50 टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (atul bhatkhalkar demand 50 percent discount in fees by amending the law)

Atul Bhatkhalkar | कायद्यात सुधारणा करून फीमध्ये 50 % सवलत द्यावी : अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या काळात भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फी करीता तगादा लावणार्‍या व फी अदा न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरणार्‍या मुंबई-नवी मुंबईतील आठ शाळांची एनओसी रद्द करण्याचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय निव्वळ धूळफेक व पालकांची फसवणूक आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनी कायद्यात सुधारणा करून फी मध्ये 50 टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.