AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मराठा समन्वयकांना अटक का? आबासाहेब पाटील यांचा सरकारला सवाल

राज्यात विविध ठिकाणी मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. अशावेळी मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी स्थानिक मराठा समन्वयक आणि प्रतिनिधींना पोलिसांकडून अटक करण्यात येत आहे. त्यावरुन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे.

राज्यात मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मराठा समन्वयकांना अटक का? आबासाहेब पाटील यांचा सरकारला सवाल
आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चा
| Updated on: Oct 29, 2020 | 1:58 PM
Share

औरंगाबाद: राज्यात सध्या मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. अशावेळी स्थानिक मराठा समन्वयकांना का अटक केली जात आहे? असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मराठ्यांची धरपकड करुन जेलभरती करायची असेल तर सरकारनं स्पष्ट सांगावं. पाच कोटी मराठा समाज स्वत: जेलभरो करेल, असा आव्हानही आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे. (Aurangabad Aabasaheb Patil on minister tour and Maratha arrest )

उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांचा औरंगाबाद दौरा आहे. मात्र, देसाई यांच्या दौऱ्यापूर्वीच मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक रमेश केरे यांना पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी नाशिकमध्येही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी काही मराठा प्रतिनिधींना अटक करण्यात आले होते. हे सर्व का आणि कशासाठी सुरु आहे? असा प्रश्न आबासाहेब पाटील यांनी विचारला आहे. राज्य सरकारला मराठ्यांची धरपकड करुन जेलभरती करायची असेल तर स्पष्ट सांगा. ५ कोटी मराठा समाज स्वत:हून जेलभरो करेल, अशा शब्दात आबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारच्या दबावतंत्रावर निषेध नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे

मराठा आरक्षणाची सुनावणी आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग झाली आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी बुधवारी सकाळी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्रीने मान्य करून सदरील प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली.

मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही- सचिन सावंत

मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही. त्यामुळेच भाजपच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक राज्य सरकारविषयी अपप्रचार सुरु असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. भाजपमध्ये असणाऱ्या मराठा नेत्यांमध्येच आरक्षणाविषयी एकमत नाही. मात्र, हे मराठा नेते एकमताने लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली.

संबंधित बातम्या:

मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही- सचिन सावंत

अखेर मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे; सुप्रीम कोर्टाने विनोद पाटलांचा अर्ज स्वीकारला

मराठा आरक्षणाला इतर समाजाच्या नेत्यांचाही पाठिंबा, शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी: सुरेशदादा पाटील

Aurangabad Aabasaheb Patil on minister tour and Maratha arrest

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.