मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही- सचिन सावंत

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. | Sachin Sawant

मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही- सचिन सावंत
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 6:31 PM

पुणे: मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकूल नाही. त्यामुळेच भाजपच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक राज्य सरकारविषयी अपप्रचार सुरु असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. भाजपमध्ये असणाऱ्या मराठा नेत्यांमध्येच आरक्षणाविषयी एकमत नाही. मात्र, हे मराठा नेते एकमताने लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली. (Congress leader Sachin Sawant take a dig at BJP over Maratha reservation issue)

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मराठा आरक्षणाच्या याचिकेची सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी बुधवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत राज्य सरकारची बाजू उचलून धरली. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आरक्षणविषयक बाजू न्यायालयात कशी मांडायची, हेदेखील सरकारला ठाऊक असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.

मात्र, राज्य सरकार लढत असलेल्या न्यायलयीन लढाईमुळे भाजपच्या पोटात दुखत आहे. फडणवीस सरकारच्या काळात आम्ही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकमताने पाठिंबा दिला होता. तरीही फडणवीस सरकारने आम्हाला तेव्हा विश्वासात घेतले नव्हते. आता भाजपच्या नेत्यांकडून महाविकासआघाडी सरकारची बदनामी सुरु आहे. भाजप नेत्यांचा हा संधीसाधूपणा जनतेला स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे आणि लोकांना फितवण्याचे धंदे बंद करावेत, असा सल्ला सचिन सावंत यांनी दिला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करावे, असा अर्ज बुधवारी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. तसेच मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यासंदर्भातही सुनावणी व्हावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली गेल्याने राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने शैक्षणिक प्रवेशावेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी आग्रही आहे.

संबंधित बातम्या:

मराठा संघटनांचे मुंबईत आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

‘मराठा आरक्षणासाठी तातडीने घटनापीठ नेमा’, राज्य सरकारची मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी

‘शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयक भूमिका स्पष्ट करावी; मग आम्ही पुढची दिशा ठरवू’

(Congress leader Sachin Sawant take a dig at BJP over Maratha reservation issue)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.