एलईडी लाईटसमुळे औरंगाबाद महागरपालिकेला मोठा फायदा; 3 कोटी 36 लाख रुपयांची बचत

| Updated on: Dec 07, 2020 | 3:33 PM

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरापालिकेने 40 हजार जुने दिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे (LED lights) लावले होते. | aurangabad mahanagarpalika

एलईडी लाईटसमुळे औरंगाबाद महागरपालिकेला मोठा फायदा; 3 कोटी 36 लाख रुपयांची बचत
Follow us on

औरंगाबाद: एलईडी लाईटसच्या वापरामुळे औरंगाबाद महानगरपालिकेला मोठा फायदा झाल्याची माहिती समोर आली आहे. या लाईटसमुळे (LED lights) महापालिकेत वीजेची मोठ्याप्रमाणावर बचत (Electrictiy bills) होण्यास मदत झाली. त्यामुळे महापालिकेला थोडाथोडका नव्हे तर जवळपास 3 कोटी 36 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. (Aurangabad mahanagarpalika electricity bill reduces)

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरापालिकेने 40 हजार जुने दिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे (LED lights) लावले होते. तेव्हापासून वीजबिलात पालिकेला प्रत्येक महिन्याला साधारण 30 लाखांचा फायदा होत आहे.

यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेला महिन्याला साधारण सव्वा कोटी रुपयांचे वीजबिल येत होते. मात्र, एलईडी दिवे लावल्यानंतर वीजबिलाची रक्कम 95 लाखांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक
सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. कारण लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात राजकारण रंगले आहे.

लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

‘श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?’
राज्यातील 3 पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली, असा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नितीन राऊत यांची फाईल फेटाळत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

राज्य सरकारनं ऊर्जा खात्याला 7 ते 8 हजार कोटी रुपये अनुदान दिल्याशिवाय वीज बिल माफी शक्य नाही. सरासरी वीज बिलात दुरुस्ती आणि 1200 युनिटपर्यंत वीज बिलमाफीचा शब्द सरकार फिरवत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

Nitin Raut | कुठल्याही वीज बिलाला माफी मिळणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं वक्तव्य

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप

‘विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?’, सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल

(Aurangabad mahanagarpalika electricity bill reduces)